

Natural Beauty Hacks: Benefits of Applying Honey and Olive Oil Daily
esakal
Honey and Olive Oil Home Remedy: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि वाढत्या प्रदूषणामुळे त्वचा अन् केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या केमिकल प्रॉडक्ट्सऐवजी पुन्हा एकदा नैसर्गिक उपायांकडे (Natural Remedies) लोकांचा कल वाढताना दिसत आहे. अशाच उत्तम नैसर्गिक उपायांपैकी एक म्हणजे मध (Honey) आणि ऑलिव्ह ऑईल (Olive Oil) यांचे कॉम्बिनेशन.
पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेले मध आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून लावल्यास ते त्वचा आणि केसांवर एखाद्या नॅचरल ट्रीटमेंटप्रमाणे काम करते. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास, चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यास आणि केस मजबूत करण्यास मोठी मदत होते.