Valentine Day | पुरुषांच्या अशा देहबोलीवर भाळतात मुली; लगेच होतात इम्प्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Valentine Day

Valentine Day : पुरुषांच्या अशा देहबोलीवर भाळतात मुली; लगेच होतात इम्प्रेस

मुंबई : प्रेमात पडण्यापूर्वी एखाद्याकडे आकर्षित होणे खूप महत्त्वाचे आहे. एखाद्याला आकर्षित करण्यासाठी आपली देहबोली देखील चांगली असली पाहिजे. योग्य देहबोली नसेल तर जुळून आलेलं नातंही टिकत नाही. (how body language of men impress girls )

पुरुषांच्या काही गोष्टी महिलांना त्यांच्याकडे आकर्षित करतात, परंतु काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे त्या दूर जातात. हेही वाचा - सोन्याची झळाळी आगामी काळात आणखी वाढणार ?

१. नकळत संरक्षण देणे

गर्दीच्या ठिकाणी मुलीला संरक्षण देणे. जर तिला दुखापत झाली तर तिची काळजी घ्या किंवा तिला दुखापत होण्यापासून वाचवा. या छोट्या-छोट्या गोष्टी स्त्रियांना खूप आवडतात आणि पुरुषांनी केलेल्या या गोष्टी त्यांना पुरुषांकडे आकर्षित करतात.

२. आत्मविश्वास

पुरूष आत्मविश्वासाने बोलत असेल तर तो महिलांना अधिक आकर्षक वाटतो. त्यामुळे तुमच्या देहबोलीत आत्मविश्वास दिसू द्या.

३. नजरेला नजर देणे

अजिबात टक लावून बघण्याची गरज नाही. पण बोलताना नजरेला नजर देऊन बोला. यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला महत्त्व देत असल्याचे कळते. तसेच तुम्ही खरे बोलत आहात हेही समजते.

४. खांद्यांचाही वापर होतो

फक्त डोळ्यांनी बोलणे आवश्यक नाही. हसणे, खांदे उडवणे आणि नंतर हळू हळू लोकांशी बोलणे खूप उपयोगाला येऊ शकते.

ज्या पुरुषांचे खांदे रुंद आहेत त्यांनी त्यांचा वापर करून बोलण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे त्यांचा वापर करून देहबोली अधिक आकर्षक बनते.

५. ओठदेखील महत्त्वाची भूमिका बजावत असतात

ओठांचे कनेक्शन देखील खूप महत्वाचे आहे आणि ते लैंगिकतेला प्रोत्साहन देते. स्त्री आणि पुरुष यांच्यातील पहिला शारीरिक संपर्क हा देखील ओठातून होतो.

पुरुषांना स्त्रिया बोलत असताना ओठांना हात लावणे किंवा दातांच्या मधोमध ओठ घेणे आवडते, तशीच परिस्थिती महिलांच्या बाबतीत असते.

टॅग्स :Valentines Daylove story