Online Marriage Certificate: लग्नाला अनेक वर्षे होऊनही बनवलं नाही मॅरेज सर्टिफिकेट? घरबसल्या मिळेल ऑनलाईन, जाणून घ्या कसं

मॅरेज सर्टिफिकेट न घेतल्यानं अनेक कायदेशीर बाबींमध्ये अडथळे येऊ शकतात.
Online Marriage Certificate: लग्नाला अनेक वर्षे होऊनही बनवलं नाही मॅरेज सर्टिफिकेट? घरबसल्या मिळेल ऑनलाईन, जाणून घ्या कसं

भारतात, लग्नासाठी मॅरेज सर्टिफिकेटचे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे, कारण ते एक कायदेशीर दस्तऐवज आहे, जे प्राप्त झाल्यानंतर विवाह कायदेशीररित्या वैध मानला जातो. हा दस्तऐवज विवाहाची तारीख, वेळ, ठिकाण आणि दोन्ही पक्षांची नावे प्रमाणित करतो. आता काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही ऑनलाइन मॅरेज सर्टिफिकेट बनवू शकता.

लग्नाचं प्रमाणपत्र न घेतल्यानं अनेक कायदेशीर बाबींमध्ये अडथळे येऊ शकतात . त्यामुळं विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेणं महत्त्वाचं आहे. आपण विवाहित आहोत याची ही एक प्रकारची अधिकृत घोषणा असते. 

एखाद्यानं लग्नाची नोंदणी केली नाही, तर त्याचा विवाह अवैध ठरतो का? या प्रश्नाचे उत्तर आहे -नाही. विवाहाची नोंदणी केली नाही आणि सामाजिक पुरावे असतील, तर ते लग्न वैध आहे. विवाहाची नोंदणी करणं हा लग्नाचा कायदेशीर पुरावा आहे.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र अनेक ठिकाणी महत्त्वाचे ठरते. मुलाचा ताबा मिळवणे, विमा दावा, बँकेतील नॉमिनेशन आणि वारसा हक्कासाठी हे प्रमाणपत्र उपयुक्त आहे.

भारतात, मॅरेज सर्टिफिकेट मिळविण्यासाठी, दोन्ही पक्षांना त्यांच्या जवळच्या रजिस्ट्रार ऑफ मॅरेज (ROM) कार्यालयात अर्ज करावा लागतो. अर्जासोबत त्यांना आवश्यक कागदपत्रेही सादर करावी लागतील.

  • आधार कार्ड किंवा पॅन कार्ड

  • आयडी सर्टिफिकेट

  • ऍड्रेस सर्टिफिकेट

  • दोन साक्षीदारांच्या सह्या

ऑफलाइन अर्ज केल्यावर, ROM अर्जाची पडताळणी करेल आणि काही दिवसात विवाह प्रमाणपत्र जारी करेल. भारतात, ऑनलाइन विवाह नोंदणीची सुविधा अद्याप सर्व राज्यांमध्ये उपलब्ध नाही. काही राज्यांनी ही सेवा सुरू केली आहे, तर काही राज्यांमध्ये ही प्रक्रिया अजूनही पारंपारिकपणे ऑफलाइन पद्धतीने केली जाते.

विवाह नोंदणीसाठी ऑनलाइन प्रक्रिया:

तुमच्या राज्याच्या विवाह नोंदणी पोर्टलला (https://edistrict.delhi) (mpenagarpalika.gov.in) भेट द्या.

नवीन खाते तयार करा आणि लॉग इन करा.

आवश्यक माहिती भरा, ज्यामध्ये लग्नाची तारीख, ठिकाण, दोन्ही पक्षांची नावे, वडिलांची/आईची नावे आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स यांचा समावेश आहे.

आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ओळखीचा पुरावा यासारखी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.

तुम्ही मॅरेज सर्टिफिकेटसाठी ऑनलाइनच पैसे देऊ शकता.

यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल आणि तुमचे ऑनलाइन मॅरेज सर्टिफिकेट काही दिवसांत अपलोड केले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com