Warm Hug :मिठी मारण्याचे हे आहेत फायदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिठी मारण्याचे हे आहेत फायदे
Warm Hug :मिठी मारण्याचे हे आहेत फायदे

मिठी मारण्याचे हे आहेत फायदे

sakal_logo
By
भक्ती सोमण-गोखले

जे शब्दातून व्यक्त करता येत नाही ते मिठीत व्यक्त करता येतं. आपल्या भावना काहीही न बोलता व्यक्त करण्याचे मिठी हे प्रभावी माध्यम आहे. जर तुम्ही खूप तणावात असाल, तुम्हाला तो तणाव असह्य झाला असेल तेव्हा तुमच्या प्रिय व्यक्तीने मिठी मारली की तुम्हाला मानसिक आधार मिळून बरं वाटायला लागतं. तणाव असल्याने तुमचा रक्तदाब, आणि हृदयाची गती कमी होऊ शकते. पण मिठी मारल्याने कॉर्टिसोल, तणावाची पातळी कमी होते, याचे समर्थन करणारे वैज्ञानिक पुरावे आहेत.

मिठी तुमच्या मानसिक आरोग्यासाठी जशी चांगली आहे, तशी तुम्हाला ती आजारी पडण्यापासून प्रतिबंधित करते. मिठी मारल्याने एखाद्या व्यक्तीची आजारी पडण्याची किंवा सर्दी होण्याची शक्यता कमी होते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. हेल्थ ऑप्टिमाइझिंग बायोहॅकर, मानसशास्त्रज्ञ, उद्योजक, जागतिक स्पीकर टीम ग्रे यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये मिठी आपल्या आरोग्यासाठी कशी फायदेशीर आणि चमत्कार करू शकते, हे सांगितले आहे.

हे आहेत फायदे

मिठीत मोठी ताकद असते. त्यामुळे तुमचा तणाव वेगाने कमी करण्यासाठी, एकंदर आरोग्य सुधारण्यासाठी, नैराश्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी, रक्तदाब कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी मिठी मारल्याने मदत होते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कडकडून मारलेल्या मिठीतून केवळ प्रेमाची भावना व्यक्त होत नाही. या भावनेच्या पलिकडे जाऊन मिठी मारण्याचे अनेक फायदे असतात. ग्रे यांच्या म्हणण्याप्रमाणे, तुमचा अगदी जवळचा मित्र किंवा जोडीदारासोबत अशी मिठी मारणे उत्तम आहे. तसेच नवीन लोकांसोबत चांगले सबंध निर्माण करायचे असतील तर त्याच्यासाठीही ते फायदेशीर आहे.

ग्रे पुढे म्हणतो की, तुम्ही जेव्हा एका मिनिटापेक्षा जास्त काळ मिठी मारता तेव्हा शब्दात व्यक्तच करू शकत नाही असे जादुई कनेक्शन तयार होते. जे विज्ञान करू शकते. आवडत्या माणसाच्या मिठित किती वेळ गेला ते सांगताच येत नाही, एक शांतता मिळते, एक उबदार भावना मिळते, असे तो सांगतो. मिठी मारल्याने हृदयाचा आरोग्याशी संबंधित असलेल्या ऑक्सिटोसिनचे उत्पादन वाढते. ऑक्सिटोसिन तसेच मिठी मारताना होणाऱ्या इतर होर्मोनल प्रतिक्रिया या खूप प्रभावी असतात. विश्वास, एकनिष्ठता, नातं दृढ करणे हे नातेसंबंधाचे मुख्य पैलू आहेत. यांच्याशी जोडले गेल्यामुळे ऑक्सिटोसिनला मिठी मारण्याचा संप्रेरक म्हणून ओळखले जाते, असे ग्रे सांगतो.मिठी हृदयाच्या चांगल्या आरोग्याशी वाढलेल्या ऑक्सिटोसिनशी संबंधित आहे. ग्रे म्हणतो, मी जेव्हा रिलेशनशीपमध्ये असतो, तेव्हा माझ्या हृदयाची गती कमी झाल्याचे मला लक्षात येते. बाहुपाशात असताना भांडणाच्या मूडमधून बाहेर पडणे किंवा चिडचिड कमी होण्यास मदत होते. निराशेतून बाहेर पडण्यामुळे मोकळा श्वास घेणं शक्य होते, असे तो सांगतो.

loading image
go to top