
Sunscreen For Indian Skin: देशभरात उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहे. अशात कडाक्याच्या उन्हात आरोग्यासह त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाच्या अतिनील किरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणे महत्वाचे असते. विशेषतः उन्हाळ्यातील स्किनकेअर रूटीनमध्ये, सनस्क्रीन ही सर्वात महत्वाची गोष्ट मानली जाते. पण, सनस्क्रीन वापरताना अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जसे की वेगवेगळ्या त्वचेच्या प्रकारांसाठी सनस्क्रीन कसं निवडावं आणि किती वेळा सनस्क्रीन लावावं. उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.