
World Suicide Prevention Day 2025
sakal
Mental Wellness: ‘आत्महत्या प्रतिबंध हा केवळ तज्ज्ञांचा विषय नसून आपण सर्वजण मदत करू शकतो. आपल्या मित्र-परिवारांची आवर्जून विचारपूस करा. आपले मत न लादता त्यांना समजून घ्या. त्या व्यक्तीने काय अनुभवले आहे ते शांतपणे ऐकणे हे सर्वात मोठे समजून घेण्याचे माध्यम आहे. त्यांना मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक, डॉक्टर यांच्याकडे जाण्यासाठी सोबत द्या. ‘तू ठीक आहेस ना’ हा छोटा प्रश्नही एखाद्याचा प्राण वाचवू शकतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला एकटं वाटू न देता सतत संवाद व संपर्क ठेवा, ’ आत्महत्या रोखण्यासाठी असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ सर्वांना देतात.