हिवाळा आला आहे आणि अनेकांना केस गळतीचा त्रास होतो. सतत केमिकलयुक्त अँटी हेअरफॉल शॅम्पू वापरुन पाहत असतो, विविध उपचार करत असतो. पण तरीसुद्धा केस गळती थांबत नाही. तुम्हाला केस गळती थांबवायची असेल तर पुढील ५ घरगुती उपाय करु शकता. .तेल लावाहिवाळ्यात सर्वजण आपले केस गरम पाण्याने आणि शॅम्पूने धुतात. ज्यामुळे आपले केस कोरडे होतात. केसांना तेल लावणे हा तुमच्या टाळूला पोषण देण्याचा आणि तुमच्या मुळांना मजबूत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता. परंतु पातळ तेल निवडण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून ते तुमच्या टाळूमध्ये चांगले प्रवेश करू शकेल. .केसांसाठी मास्क वापरातुम्ही बाजारातून नैसर्गिक हेअर मास्क खरेदी करू शकता आणि तो वापरू शकता. जर तुम्हाला तो घरी बनवायचा असेल तर दह्यामध्ये जास्वदांच्या फुलांची पेस्ट मिसळा आणि केसांना लावा. यामुळे तुमचे टाळू खोलवर स्वच्छ होण्यास, केस गळणे थांबण्यास आणि केस मुळांपासून मजबूत होण्यास मदत होते. हवे असल्यास, तुम्ही त्यात 2 चमचे नारळाचे तेल देखील मिसळू शकता..आवळा हेअर पॅकआवळा केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, बायोटिन आणि लोह यांसारखे अनेक पोषक घटक असतात. आवळा पावडरपासून बनवलेला हेअर पॅक केसांना लावल्याने केस गळणे आणि अकाली पांढरे होणे थांबण्यास मदत होईल. तुमचे केस वाढणे थांबले असले तरीही ते फायदेशीर ठरू शकते..कढीपत्त्याची पेस्टकढीपत्ता केसांसाठी खुप फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन ए, बी, सारखे अनेक पोषक घटक असतात. केसांना मजबुत आणि घनदाट बनवते. तुम्ही हेअर मास्क किंवा तेल तयार करुन केसांना लावू शकता. .डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.