
Swarnima Scheme For Women: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने महिला उद्योजकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. स्वर्णिमा योजना अंतर्गत मागासवर्गीय महिलांना २ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज अवघ्या ५% व्याजदराने दिलं जाणार आहे. कोणतीही सुरुवातीची गुंतवणूक न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ही उत्तम संधी आहे. सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा मार्फत ही योजना राबवली जात आहे.
ही योजना मोदी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ यांसारख्या उपक्रमांना पूरक असून, महिला उद्योजकांसाठी मोठी संधी ठरू शकते. महिला उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा! या योजनेसाठी अर्ज कसा करावा, काय आहेत नियम अटी जाणून घेऊया सविस्तर