lifestyle
lifestylesakal

खिडक्यांच्या काचा पुसायच्या? महागडे ग्लास क्लिनरची आवश्यकता नाही, या तीन सोप्या ट्रिक्स ट्राय करा

काही घरगुती ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरचे काच नव्यासारखे चमकणार.

प्रत्येकाला आपलं घर स्वच्छ ठेवावं, असं वाटतं. त्यामुळे अनेकांना साफ सफाई करण्याची सवय असते. घर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोजची घरची सफाई करणेही गरजेचे असते. आपण घर स्वच्छ करतो मात्र घरच्या खिडक्या किंवा दरवाज्याला लावलेला काच साफ करणे खुप जोखमीचं काम आहे. काचेच्या खिडक्या लवकर खराब होतात.

अनेकजण या खिडक्यांवरील घाण पुसण्यासाठी महागडे ग्लास क्लीनर वापरतात. मात्र आज आम्ही तुम्हाला काही घरगुती ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरचे काच नव्यासारखे चमकणार. (How to clean window glass at home check easy tricks ndj97)

lifestyle
Lifestyle Tips: घरच्या घरी बनवा नीम साबण

बेकिंग सोडा

स्वयंपाकघरात वापरत असलेला बेकिंग सोडाच्या मदतीने तुम्ही घरच्या खिडक्यांची काच साफ करू शकता. यासाठी बेकिंग सोडा सॉफ्ट कपड्यावर घेऊन काच वर घासा. त्यानंतर सुती कपडा आणि पाण्याने खिडकी पुसा.

lifestyle
वाऱ्यामुळे तुटला Glass bridge; ३३० फुटांवर लटकला पर्यटक

व्हिनेगर

व्हिनेगरच्या मदतीनेही तुम्ही काच साफ करू शकता. व्हिनेगरला स्प्रेच्या बॉटलमध्ये टाका आणि काच साफ करताना काचेवर हा स्प्रे मारा. त्यानंतर कापडाने काच पुसा.

मीठ

मीठाचा वापर करूनही तुम्ही खिडक्याची काच साफ करू शकता. यासाठी पाण्यात हलके मीठ घाला. आणि हे पानी आता खराब काचेवर टाका आणि काच साफ करा. मीठात असलेले केमिकल्स दुर्गंधी साफ करण्यास मदत करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com