

Turn Your Cooler into Room Heater with This 130 Rupee Hack
esakal
हिवाळा आला की घर गरम ठेवण्यासाठी रूम हीटरची गरज भासते. पण बाजारातले चांगले हीटर ३-४ हजारांपासून सुरू होतात. अशा वेळी अनेकजण हात आखडतात. पण आता एक जबरदस्त हॅक व्हायरल होतोय.. तुमचा जुना एअर कूलर फक्त १३० रुपयांत रूम हीटरमध्ये बदलता येईल. होय, ऐकायला भारी वाटतंय, पण हे खरंच शक्य आहे तेच आपण पहायच आहे. सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर हजारो लोक हा उपाय वापरून पाहत आहेत आणि त्याची स्तुती करत आहेत. विशेष म्हणजे यासाठी फारशी मेहनतही नाही आणि खर्च तर किरकोळ आहे