गरजेपेक्षा जास्त भावनिक आहे जोडीदार, नातं कसे टिकवावे? | Relationship Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

How to Deal With Emotionally Unstable partner

Relationship Tips : गरजेपेक्षा जास्त भावनिक आहे जोडीदार, नातं कसे टिकवावे?

Relationship Tips in Marathi: नात्यामध्ये प्रेम असते तेव्हा लोक ते नातं मनापासून निभावतात पण काही नाती(Relationship) अशी असतात जिथे पार्टनर खूप भावूक होतात. अशा जोडीदारांसोबत आयुष्य घालवणे म्हणजे काट्यांवरून चालण्यासारखे आहे. कधी, कुठल्या गोष्टीमुळे जोडीदाराचे मन दुखावेल याचा नेम नाही. विशेषत: विवाहित जोडप्यामध्ये (Married couple)हा त्रास वाढत जातो. पती-पत्नीमध्ये प्रेमासोबत एकमेकांच्या भावना समजून घेण्याची गरज असते आणि आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवण्याची गरज असते. (How to Deal With Emotionally Unstable partner)

भावनिक(Emotional) लोकांची इच्छा असते की, त्यांच्या जोडीदाराने नेहमी त्यांच्या आसपास राहायला हवं. पण त्यामुळे समोरच्याला स्पेस (Space)मिळत नाही आणि कित्येकदा संबध तूटून जातात. जर आपला पार्टनर गरजेपेक्षा जास्त इमोशनल असेल तर तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.

How to Deal With Emotionally Unstable partner

How to Deal With Emotionally Unstable partner

हेही वाचा: नवलंच! डिजिटल अवतारात मेटाव्हर्सवर लग्न करणार तामिळनाडूतील जोडपं

जोडीदाराच्या मताला महत्त्व द्या

जर तुमचा जोडीदार खूर भावूक असेल तर तुम्ही त्यांनी सांगितलेले प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ऐका. त्यामुळे तुम्हाला समजेल की त्यांच्या मनात काय सुरू आहे. त्यांचे म्हणणे ऐकून तुम्ही निर्णय घेऊ शकता की, त्यांच्यासोबत तुम्हाला कसे वागले पाहिजे. जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा त्यांच्यासोबत बसून गप्पा मारा. आणि या गोष्टीची काळजी की ते जर काही बोलत असतील तर तुम्ही त्यांना बोलताना मध्ये तोडू नका.

सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा

जर तुमचा जोडीदार नेहमी भावूक गोष्टी करत असेल आणि त्यांना वाटत असेल की तुम्ही त्यांच्या आसपास राहायला हवं तर, त्यांसोबत बसून त्यांचे अशा वागण्याचे कारण विचारा. जर कोणी व्यवस्थित उत्तर देऊ शकले नाही तर तुम्ही त्याला प्रेमाने समजवा. तुम्ही दाखविलेल्य विश्वासामुळे त्याचे मनात तुमच्या नात्याबाबत असुरक्षितेतची भावना आणि भावूक होणे कमी होईल.

हेही वाचा: मार्चमध्ये 12 ते 14 वयोगटातील मुलांचं लसीकरण? अधिकाऱ्यांचे संकेत

How to Deal With Emotionally Unstable partner

How to Deal With Emotionally Unstable partner

प्रेमाची जाणीव करून द्या

रिलेशनशीपमध्ये सुरक्षित वाटवे यासाठी तुम्ही त्यांना तुमच्या प्रेमाची जाणीव करून द्यायला पाहिजे. त्यांची आवड-निवड याची काळजी घेतली पाहिजे. त्यांना वेळोवेळी काहीतरी गिफ्ट (Gift) देऊन किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्पेशल (Special)वागणूक देऊ शकता. त्यामुळे त्यांना समजेल की, तुम्हाला त्यांची काळजी आहे आणि त्यांच्या भावनांची तुम्हाला कदर ठेवता. त्यानंतर ते त्यांच्या मनातील सर्वकाही तुमच्या सोबत शेअर(Share) करू शकतील.

Web Title: How To Deal With Emotionally Unstable Partner

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..