
Cleansing Tips
sakal
आपण कित्येक गोष्टी या निरीक्षणातून शिकत असतो. त्यासाठी आपल्याला बसवून शिकवण्याची गरज नसते. लहानपणी घरात आजूबाजूला असलेलं वातावरण याचा प्रभावही आपल्यावर आपसूक होत असतो. अभिनय क्षेत्रात आल्यानंतर असे कळत नकळत माझ्यावरही संस्कार घडत गेले. मेकअप कसा करायचा, मेकअप व्हॅनिटी कशी तयार करायची, हे सगळं मी निरीक्षणातून शिकत गेले. एक तर आता रोज मेकअप करायचा म्हणजे आपली त्वचा खराब होणार की काय, असा एक भाबडा प्रश्न माझ्यासमोर तेव्हा पडला होता.