Winter Clothes Drying Tips: थंडीच्या दिवसांत कमी ऊन्हात कपडे कसे वाळवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter Clothes Drying Tips

Winter Clothes Drying Tips: थंडीच्या दिवसांत कमी ऊन्हात कपडे कसे वाळवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

थंडीच्या दिवसांत गृहिणींची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे कपडे वाळवणे. थंडीच्या दिवसांत कमी ऊन्हात घरातील सगळ्या सदस्यांचे धुतलेले कपडे कसे वाळवावे हा प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न असतो. अशात सर्वसामान्य घरातील गृहिणी सूर्य उगवण्याच्या आणि कडक ऊन तापण्याच्या आशेवर असतात. कमी ऊन्हामुळे कपडे वाळत नसल्यास तुम्ही या सोप्या ट्रिक्स वापरत कपडे वाळवू शकता.

थंडीच्या दिवसांत असे वाळवा कपडे

  • सगळ्यात महत्वाचे म्हणजे थंडीच्या दिवसांत एकावेळी संपूर्ण कपडे धुवायला काढू नका. असे केल्यास तुम्हाला कपडे वाळवण्याच्या जास्त समस्या येणार नाहीत. ऊन निघाल्यास थोडे थोडे कपडे धुवायला काढा.

  • कपड्यांना व्यवस्थित पिळून घ्या जेणेकरून कपड्यांमध्ये पाणी शिल्लक राहाणार नाही. असे केल्यास तुमचे कपडे फॅनमध्येही सहज वाळेल. किंवा हवेने देखील सहज वाळेल.

  • थंडीच्या दिवसांत एकावर एक कपडे वाळू टाकू नका. कारण थंडीच्या दिवसांत एकावर एक टाकलेले कपडे वाळणे कठीण असते. तसेच ऊन न निघाल्यास कपडे वाळवण्यासाठी अशी खोली बघा जेथे वेंटिलेशन चांगले असेल व हवा खेळती असेल.

हेही वाचा: Remedies For Winter Issues: थंडीच्या दिवसांत वारंवार आजारी पडताय ? 'या' पाच गोष्टी आहारात घ्या

  • तुम्हाला घाईत कुठे जायचे असेल आणि तुमचे कपडे हलके वाळले असतील तर त्याला आयरन करून घ्या. कपडे आयरन केल्यास लवकर वाळतात.

  • या काही टीप्स तुम्ही फॉलो केल्यास तुम्ही तुमचे कपडे थंडीच्या आणि कमी ऊन्हाच्या दिवसांत सहज वाळवू शकता.