esakal | खरा की खोटा? ओरिजनल मोती कसा ओळखाल?
sakal

बोलून बातमी शोधा

खरा की खोटा? ओरिजनल मोती कसा ओळखाल?

खरा की खोटा? ओरिजनल मोती कसा ओळखाल?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

ज्योतिषशास्त्रामध्ये रत्नांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अनेक ज्योतिष नागरिकांना राशी आणि ग्रहांनुसार ठराविक रत्न किंवा मोती परिधान करण्याचा सल्ला देतात. मोत्याची अंगठी किंवा चेन घातल्यामुळे त्याचा फायदा होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे या मोत्यांनी विशेष मागणी असून ते प्रचंड महाग असल्याचं पाहायला मिळतं. ज्वेलर्सच्या दुकानातही मोती सहज उपलब्ध होतात. परंतु, अनेकदा खरा मोती म्हणून काही बनावट मोती ग्राहकांना विकले जातात. त्यामुळेच खरे मोती आणि बनावट मोती यांच्यातील फरक कसा ओळखावा ते पाहुयात. (how-to-find-if-a-pearl-is-real-ssj93)

१. तापमान चेक करा -

खरा मोती हा आपल्या शरीराच्या तापमानाप्रमाणे बदलतो. सुरुवातीला तुम्ही मोत्यांना स्पर्श केला तर तो थंड असल्याचं जाणवेल. त्यानंतर तुमच्या शरीराच्या तापमानाप्रमाणे तो हळूहळू गरम होत जाईल. उलटपक्षी जर मोती खोटा किंवा बनावट असेल तर त्याचं तापमान हे रुम टेंपरेचरप्रमाणेच असेल. त्याच्या तापमानात कोणताच बदल होणार नाही.

हेही वाचा: नोटीस पीरिअडमध्ये 'या' गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका!

२. रंग -

जर मोती खरा असेल तर त्यात नैसर्गिक चमक असते. त्याच्यावर गुलाबी रंगाची किंचतशी झाक असते. पण मोती खोटा असेल तर तो पांढरा शुभ्र असतो. त्याचप्रमाणे तो चकाकत असताना प्लास्टिकप्रमाणे भासतो.

३. वजन -

खरा मोती वजनाने जड असतो. त्यामुळे मोती खरा आहे की नाही हे चेक करायचं असेल तर त्याला हवेत उडवा आणि हातात पकडा. हा मोती हातात पकडत असताना त्याचं वजन पटकन जाणवतं. तुलनेने हलका मोती हवेत उडवल्यानंतर जर पकडला तर तो प्रचंड हलका असल्याचं लक्षात येतं. खोटे मोती हे सॉलिड ग्लास बीड्सपासून तयार केलेले असतात त्यामुळे ते वजनाने हलके असतात.

४. ड्रिल होल्स चेक करा -

प्रत्येक मोतीमध्ये ड्रिल होल्स असतात. परंतु खऱ्या मोतीमध्ये हा होल अत्यंत लहान असतो. तुलनेने खोट्या मोतीमध्ये तो किंचितसा मोठा असतो.

५. आकार -

प्रत्येक मोतीचा आकार हा वेगवेगळा असतो. काही मोती मोठ्या आकाराचे असतात. तर काही लहान. तसंच प्रत्येक मोत्याचा रंगदेखील वेगवेगळा असतो. परंतु, खोटे मोती एकाच आकाराचे व रंगाचे असतात.

loading image