
मुंबई : रस्ता अपघातग्रस्तांच्या सुरक्षिततेचे नियमन आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने मान्यताप्राप्त, मोटार वाहन कायदा १९८८ द्वारे मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाची (एमएसीटी) स्थापना करण्यात आली आहे.
नुकसान भरपाईच्या दाव्यांवर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारे दावा न्यायाधिकरण स्थापन करतात. मृत्यू किंवा व्यक्तींना शारीरिक इजा किंवा तृतीय पक्षांच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान होणाऱ्या मोटार वाहन अपघातात दावा मिळवून देण्याचे काम हे न्यायाधिकरण करतात. हेही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा ?
मोटार वाहनांच्या अपघातात बळी पडलेल्यांना योग्य वेळी कोणताही विलंब न करता मदत करणे, हा न्यायाधिकरणाचा उद्देश आहे. मोटार अपघात दावा न्यायाधिकरण मोटार अपघातांमुळे होणारे जीवित/मालमत्ता किंवा दुखापतीच्या प्रकरणांशी संबंधित दावे हाताळतात.
मोटार वाहन कायद्यांतर्गत नुकसान भरपाईसाठी दावा
कोण भरपाईचा दावा करू शकतो ?
एखादी व्यक्ती, जिला स्वतःला दुखापत झाली आहे किंवा वाहन अपघातात नुकसान झालेल्या मालमत्तेची मालकी आहे किंवा मोटार अपघातात मृत व्यक्तीची कायदेशीर प्रतिनिधी आहे किंवा जखमी व्यक्तीची योग्यरित्या अधिकृत प्रतिनिधी आहे किंवा मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १६६ मध्ये मृत व्यक्तीचे कायदेशीर प्रतिनिधी नुकसानभरपाईचा दावा करू शकतात.
भरपाईचा दावा कधी करता येईल ?
मोटार वाहन कायद्यात नुकत्याच करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार, मर्यादेचा कालावधी म्हणजे, ज्या कालावधीत नुकसानभरपाईचा दावा दाखल करावा लागतो, तो अपघात घडल्यापासून सहा महिन्यांचा आहे. याचा अर्थ असा की, सहा महिन्यांची मुदत संपल्यानंतर, नुकसानीचा दावा करणारा कोणताही अर्ज वैध किंवा विचारात घेता येणार नाही.
याव्यतिरिक्त, कलम १७२ (१) अंतर्गत दावा न्यायाधिकरण सांगते की, विमा कंपनी किंवा नुकसानभरपाईच्या दाव्यातील कोणताही पक्ष नुकसानभरपाई म्हणून विशेष खर्च देण्यासदेखील बांधील आहे.
जर हे निश्चित असेल की, नुकसानभरपाईचा दावा अवैध आहे कारण, विम्याची पॉलिसी कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा चुकीची माहिती देऊन किंवा कोणत्याही पक्षाने किंवा विमाकर्त्याने खटल्याच्या कार्यवाहीदरम्यान खोटा दावा किंवा बचाव प्रस्तावित केल्याने नुकसान भरपाईचा दावा अवैध आहे. या विशेष खर्चाची भरपाई, विमा कंपनीला किंवा ज्या पक्षाविरुद्ध असा दावा किंवा बचाव केला गेला आहे, त्यांना दिली जाणे आवश्यक आहे.
काही वकिलांनी मोटार अपघात दावा न्यायाधिकरणांतर्गत खोटे दावे सादर करून विमा कंपन्यांचे अनेक कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे अनेक अहवालांनी सूचित केले आहे. उत्तर प्रदेशचे विशेष तपास पथक अस्तित्वात आल्यानंतर अनेक फसव्या बाबी ओळखण्यात यशस्वी झाले आहेत, ज्यामुळे जनतेच्या शेकडो कोटी रुपयांची बचत झाली आहे.
उत्तर प्रदेश एसआयटीचा हा प्रयत्न विमा फसवणुकीपासून जनतेचे रक्षण करण्यास मदत करतो आणि सार्वजनिक पैशाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी इतर राज्य सरकारांनीही याची दखल घेतली पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.