जोडीदाराने केलेल्या विश्वासघातामुळे दुखावले गेलात? सदगुरूंनी सांगितलेला उपाय ऐकल्यास मन होईल मजबूत

Tip On How To Get Over Cheating : प्रेमप्रकरणात झालेला विश्वासघात विसरणे सोपे नसते. पण जोडीदाराने केलेल्या विश्वासघाताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्यास भूतकाळ विसरून पुढे जाणे खूप सोपे होऊ शकते.
Tip On How To Get Over Cheating
Tip On How To Get Over CheatingSakal

प्रत्येक व्यक्तीला आपल्या नातेसंबंधामध्ये जोडीदाराकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा असते, यात काहीच शंका नाही. यात काहीही गैर नाहीय, पण कोणत्याही व्यक्तीने आपल्या जोडीदाराकडून ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अट घालू नये. 

कारण तुमची ही कृती तुमच्याच दुःखाचे कारण होऊ शकते. मनुष्यप्राणी जीवनात त्याच्या स्वभावानुसार निर्णय घेत असतो, हे प्रत्येकानेच समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच प्रेम, प्रामाणिकपणा यासारख्या भावनिक गोष्टी आपण कोणाकडूनही जबरदस्तीने मिळवू शकत नाहीत. 

Tip On How To Get Over Cheating
Relationship Tips : या गोष्टी परफेक्ट असतील तर तुमचं नातं कधीच तुटणार नाही!

याबाबत सदगुरू यांनीही आपले विचार व्यक्त केले आहे. ‘लोकांनी आपली फसवणूक केली, अशा तक्रारी करणे बंद करा’, असे विधान सदगुरू यांनी केले आहे. नात्यात होणाऱ्या विश्वासघाताबद्दल त्यांचे विचार ऐकून कदाचित आपण सहमत होणार नाही.

पण जेव्हा त्यांच्या या विधानामागील खरा अर्थ तुम्हाला समजेल तेव्हा कोणाकडूनही होणाऱ्या फसवणुकीमुळे तुमच्या मनावर आघात होणार नाहीत.

‘त्याने/तिने मला फसवले हे म्हणणे चुकीचे’

सदगुरू म्हणतात की, जर जोडीदाराने तुमची फसवणूक केली तर त्याने तुमचा विश्वासघात केला आहे हे प्रत्येकाला सांगू नका. त्याऐवजी त्याने तुमचा गैरसमज दूर केला असे म्हणा. त्याने तुमच्यासमोर असे सत्य समोर आणले आहे, की ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता. कारण तुम्ही त्याच्यासोबत तुमचे वर्तनमान व भविष्यातील क्षण अविस्मरणीय ठरावेत, याचाच विचार करण्यात खूप व्यस्त होतात.

Tip On How To Get Over Cheating
Relationship tips: रिलेशनशिपमध्ये असूनही एकटेपणा वाटतोय? मग या टीप्स करा फॉलो

विश्वासघात करणाऱ्यांना म्हणा धन्यवाद 

ज्या व्यक्तीसोबत तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य व्यतीत करण्याचे स्वप्न पाहिले, अशा व्यक्तीकडून फसवणूक होणे म्हणजे नक्कीच मनावर मोठा आघात होण्यासारखेच आहे. पण या गोष्टीकडे जर आपण वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले तर विश्वासघाताचे हे दुःख तुम्हाला एखाद्या सकारात्मक गोष्टीसारखेच वाटेल. 

Tip On How To Get Over Cheating
Couple Relation : रिलेशनशिपमध्ये येण्याचे परफेक्ट वय काय?

यावर सदगुरू म्हणतात की, जे लोक तुमचा विश्वासघात करतात, त्यांना धन्यवाद बोला. त्यांचे आभार व्यक्त करा. कारण ही मंडळी तुम्हाला वास्तवाची ओळख करून देतात. संबंधित व्यक्तीने फसवणूक केली नाही तर तुम्ही त्या व्यक्तीची साथ कधीच सोडणार नाही आणि यामुळे तुमचे भविष्य खराब होण्याची शक्यता असते. 

तर मित्रांनो सदगुरूंनी दिलेल्या मूलमंत्राचा नक्की विचार करा आणि स्वतःचे भविष्य खराब होणार नाही, याची काळजी घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com