esakal | टाटा-बिर्ला-अंबानी व्हायचंय? 'असे' मार्ग जे तुम्हाला श्रीमंत बनवतील
sakal

बोलून बातमी शोधा

टाटा-बिर्ला-अंबानी व्हायचंय? 'असे' मार्ग जे तुम्हाला श्रीमंत बनवतील

टाटा-बिर्ला-अंबानी व्हायचंय? 'असे' मार्ग जे तुम्हाला श्रीमंत बनवतील

sakal_logo
By
विनायक होगाडे

श्रीमंत होणं! हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. कुठूनतरी छप्परफाड लॉटरी लागावी आणि एका रात्रीत श्रीमंत व्हावं, अशी स्वप्न कित्येकजण पाहतात. कित्येक जण लखपती-करोडपती होण्यासाठी धडपडत असतात. काहीजण यशस्वी उद्योजक व्हायच्या प्रयत्नात असतात. स्वत:चा मोठा बंगला असावा, अलिशान घराच्या समोर महागड्या गाड्या असाव्यात, बिझनेस असा असावा की निवांत वेळ काढून कुठेही फिरायला जाता यावं... ब्ला... ब्ला... ब्ला... मात्र, हे सगळं एका रात्रीतच घडेल अशी स्वप्न पाहणाऱ्यांनी श्रीमंत होण्याचा प्रवास नेमका काय आहे आणि तो कसा होऊ शकतो, याचा आधी अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल.

1. उद्योजक बना! आपल्या स्कील्स उद्योगात लावा

इतरांपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाचं ध्येय उराशी बाळगा. त्यावर काम करा, त्यासाठी सतत शिकत रहा, स्वत:ला सतत अपडेट करत रहा, स्वयंमूल्यमापन करा आणि सतत सुधारणा करत रहा. तुम्ही अनेक खेळाडूंना आणि कलाकारांना करोडपती झालेलं पाहिलं असेल त्याचं हेच कारण आहे की त्यांचे स्कील्स पूर्णपणे वापरतात आणि सतत शिकत राहतात. हे सगळीकडेच लागू होतं. तुम्ही कशात तरी बेस्ट आहात, हे समजलं की त्यातल्या मोठ्या संधी तुम्हाला दिसायला लागतात. त्यामुळे त्यातील तज्ज्ञ व्हायचं असेल तर स्वत:मध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया थांबवू नका. यशस्वी लोक नेहमी, वेळ, उर्जा आणि पैसे यांची गुंतवणूक स्वत:ला सुधारण्यासाठी करतात.

2. आधी लखपती बनण्यासाठी सेव्हींग करा

सगळ्यांनाच करोडपती बनायचं आहे. मात्र, ही काही खायची पेंड नाहीये. हे स्वप्न काही असंच एका रात्रीत साध्य होणार नाहीये. सर्वांत आधी लखपती व्हायचं ठरवा. त्यासाठी लहान का होईना पण दररोज थोडीतरी बचत करायला सुरुवात करा. तुम्ही भलेही दररोज 100 अथवा 200 रुपये बाजूला काढून ठेवू शकत असाल, मात्र हेच रुपये उद्या तुम्हाला उभं करुन करोडपतीकडे घेऊन जाणारे मदतनीस ठरतील.

3. गुंतवणूकदार बना

खूप पैसे बनवण्याचा विचार करण्यापेक्षा खूप लोकांना मदत करण्याचा विचार डोक्यात आणत रहा. लोकांना काय हवंय, काय दिल्यावर समाज अधिक पुढे सरकेल याबाबत तुम्ही काय नवं करु शकता, याचा विचार करत रहा. इतकंच नाही, तर उद्याच्या जगामध्ये आवश्यक आणि महत्त्वाची बनेल अशी कोणती गोष्ट तुम्ही साकारु शकता, याचा विचार करत रहा. स्वत:ची गुंतवणूक त्यात करा.

4. स्टार्ट-अप सुरु करा

कल्पना सुचल्यानंतर त्या कल्पनेला साकार करण्यासाठी स्टार्ट-अप सुरु करा. एक किंवा अधिक स्टार्ट-अप कंपन्यांचे स्टॉक असणे ही एक मौल्यवान गुंतवणूक असू शकते. यातूनच मोठे कॅपिलट गेन करण्याच्या शक्यता तयार होतात. ऍपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट अशा कंपन्या याच मार्गाने मोठ्या झाल्या.

5. मालमत्ता विकसित करा.

विकत घेणे, विकसित करणं आणि ती संपत्ती विकणं हा लोकांसाठी भांडवल जमा करण्याचा नेहमीचा असा एक प्रमुख मार्ग आहे. समजा तुमच्याकडे 50 हजार आहेत आणि तुम्ही दोन लाखाचं कर्ज काढून चार अडीच लाखांची एक प्रॉपर्टी विकत घेतली. त्यानंतर ती प्रॉपर्टी विकसित करुन ती चार लाखांना विकलीत. प्रॉपर्टीचं मूल्य 60% नी वाढलंय परंतु आपले 50,000 रुपये आता चारपट वाढून 200,000 झाले आहेत. याच पद्धतीने हुशारीने आपल्याला पुढे सरकावं लागेल. प्रॉपर्टी मार्केटमधील तेजी आणि मंदीचा तुम्हाला नेहमीच धोका राहिल. मात्र, दीर्घकाळासाठी संपत्ती जमा करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

6. शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करा आणि चांगला पोर्टफोलिओ तयार करा

जर तुम्ही लाँग पीरियडसाठी स्टॉक मार्केटमध्ये स्थिर गुंतवणूक करत राहिलात तर तुमचा एक चांगला पोर्टफोलिओ तयार होऊ शकतो. या आधारावर तुम्ही चांगली संपत्ती उभी करु शकता.

7. स्वत:चा व्यवसाय सुरु करा.

अलिकडच्या वर्षांत कित्येक स्टार्टअपनी चांगल्या रिटर्नसह उत्तम कामगिरी केल्याचं आढळून आलं आहे. जर तुम्हाला बाजारात काय हवंय, याची नस सापडली ती गरज तुम्ही भागवू शकलात, तर तुम्हाला त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. मग ते काहीही असू शकतं. अगदी क्लिनींग बिजनेसपासून फूड डिलीव्हरीपर्यंत... मोठा उद्योग साकारायला कदाचित काही वर्षे जाऊ शकतीलही मात्र, हेच स्टार्ट-अप तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकेल.

8. खर्च कमी आणि बचत जास्त

कमी खर्च करणे ही एकप्रकारे बचतच असते. तुम्ही कमी खर्च करण्याची सवय लावून घ्याल, तर तुमचा उद्योग आणि व्यवसाय तुम्ही अधिक वर नेऊ शकाल. बचत करण्यासाठीच्या सवयीही लावून घ्या. त्यासाठी गोल्स सेट करा.

loading image
go to top