Fake Dry Fruits : खरे की बनावटी, तुम्ही कोणते ड्राय फ्रूट्स विकत घेताय हे कसं कळेल? इथे वाचा ट्रिक

तुम्ही घाईगडबडीत घेतलेले ड्रायफ्रूट्स बनवाटी सुद्धा असू शकतात
Fake Dry Fruits
Fake Dry Fruitsesakal

Fake Dry Fruits : सगळीकडे गणेशोत्सवाचे वातावरण सुरु आहे. या काळात प्रत्येक घरी गोडधोड पदार्थ बनवल्या जातात. यात ड्रायफ्रूट्सही घातले जातात. घरात ड्राय फ्रूट्स आणणे समृद्धीचे प्रतिक मानले जाते. मात्र सणांच्या काळात ड्राय फ्रूट्सची विक्री दुप्पट होते. अशात तुम्ही घाईगडबडीत घेतलेले ड्रायफ्रूट्स बनवाटी सुद्धा असू शकतात. अशात खरे आणि बनावटी ड्राय फ्रूट्स कसे ओळखायचे ते जाणून घेऊयात.

बनावटी ड्राय फ्रूट्स बनवण्याचे तोटे

ड्राय फ्रूट्सचे सेवन करणे आरोग्यासाठी फायद्याचे असते. शरीरास अनेक पोषक तत्व मिळतात. बनावटी ड्राय फ्रूट्सना कलर देऊन हूबेहूब खरे ड्रायफ्रूट्स दिसू शकतात. अशा ड्राय फ्रूट्सच्या सेवनाने पोटदुखी, फूड पॉयझनिंग, उलट्या होणे, पोटाशी संबंधित विकार यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

Fake Dry Fruits
Dry Fruits वजन कमी करण्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या...

बनावटी ड्रायफ्रूट्स कसे ओळखाल?

खऱ्या आणि बनावटी ड्राय फ्रूट्सच्या रंगात आणि चवीत फार फरक असतो. चांगल्या दर्जाचे ड्राय फ्रूट्स विकत घेण्यासाठी विश्वासपात्र ब्रँडची निवड करा. खऱ्या आणि बनावटी ड्राय फ्रूट्समधील फरक समजून घेण्यासाठी या काही टिप्स फॉलो करा.

बनावटी बदाम कशा ओळखाल?

बदामचा रंग काही काळाने फिका पडत असेल तर समजावे बदाम बनावटी आहे.

बनावटी बदाम ओळखण्यासाठी कलर कोटिंग चेक करा.

बदाम हाताने चोळून बघा. त्यांचा रंग निघाल्यास त्या बनावटी असल्याचे कळते.

Fake Dry Fruits
Dry Skin Care Tips : कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी एक्सपर्ट्स सांगतात काही घरगुती उपाय

बनावटी मनुके

मनुके ओले असेल तर त्यात पाण्याचे थेंब दिसत असतील तर असे मनुके बनावटी असू शकतात.

बनावटी मनुक्यांचा सुगंध घेतल्यास त्यातून सल्फरचा वास येतो.

मनुके हातांने चोळल्यास त्यातून पिवळा रंग बाहेर पडतो.

बनावटी काजू

हलक्या पांढऱ्या रंगाचे काजू बनावटी असतात.

काजू जास्त पिवळसर दिसत असतील तर ते बनावटी असू शकतात.

तेलाचा वास आल्याससुद्धा ते बनावटी असल्याचे कळते. (Lifestyle)

बनावटी पिस्ता

बनावटी पिस्ता गडद रंगाचा दिसतो. बनावटी पिस्त्याचा रंग तेलासारखा येतो. तर खरा पिस्ता हलका हिरवट रंगाचा असतो. किंवा सोनेरी रंगाचा असू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com