
mental well being tips from bhagwad gita
esakal
इतरांच्या कौतुक-टीकेला क्षणिक ढगाप्रमाणे पहा आणि मन विचलित होऊ देऊ नका, स्वतःच्या कर्तव्यावरच लक्ष केंद्रित करा.
समाजाच्या दबावात 'चारचौघे काय म्हणतील' यापेक्षा 'मी काय अपेक्षित आहे ते करावे' हे प्राधान्य द्या, जेणेकरून स्वतंत्र ओळख टिकेल.
भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाने सत्याशी प्रामाणिक राहा, यामुळे मानसिक शांती मिळेल आणि अनावश्यक दडपण टाळता येईल.
समाज म्हणजे एक बहुरंगी आणि बहुविध मतमतांतरांचा एक कोलाहल असतो. आपल्या जवळच्या कुटुंबापासून ऑफिसमधील सहकारी, शेजारी, मित्रपरिवार आणि सोशल मीडियाच्या या मांदियाळीत सल्ले, मते आणि टीकेची कमतरता कधीच जाणवत नाही. अर्थात प्रत्येक सल्ला किंवा मत आपल्यासाठी हानिकारक असतं, असं अजिबात नाही. काही प्रमाणात इतरांची मते जाणून घेणे आणि त्यानुसार काहीसे बदल करणेही हितकारक ठरू शकते.
पण बहुतांश वेळा असं होत नाही. इतरांच्या मतांचं आणि त्यांच्या सल्ल्यांचं किंवा टीकेचं आपल्यावर प्रचंड दडपण असतं. यातून बाकी काही घडो अथवा नाही, आपली स्वतंत्र ओळख आणि समाधान मात्र हरवत जातं. सतत दुसऱ्यांच्या मतांवर विसंबून राहणं आणि त्यांचे सल्ले-टीकेला अनावश्यक महत्त्व देणं हे कधीच न संपणारं चक्र निर्माण होतं. यातून निर्माण होते प्रचंड मानसिक दडपण.