हिवाळ्यात मुलांना उबदार कसे ठेवालं? जाणून घ्या सोपी पद्धत| children warm in winter | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child Care In Winter

Baby Care : हिवाळ्यात मुलांना उबदार कसे ठेवालं? जाणून घ्या सोपी पद्धत

हिवाळा सुरू झाला असून, चांगलीच थंडी पडायला लागली आहे. या दिवसांत प्रत्येक आईसाठी सर्वांत मोठी चिंता असते आपल्या मुलांना उबदार कसे ठेवता (How to keep children warm in winter) येईल. त्यांचे थंडीपासून कसे सुरक्षा करता येईल. कमी तापमान लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. कारण, त्यांच्या शरीराची यंत्रणा तापमान राखण्यासाठी पुरेशी परिपक्व नसते.

थंडीच्या दिवसांमध्ये लहान मुले सर्दी, फ्लू, व्हायरल इन्फेक्शन यासारख्या आजारांना सहज बळी पडू शकतात. सर्दी आणि खोकल्याचा परिणाम काही विशिष्ट प्रकारच्या ॲलर्जीमुळे ग्रस्त असलेल्या मुलांमध्ये दीर्घकाळ दिसून येतो. बदलत्या हवामानामुळे आणि प्रदूषणामुळे काही मुलांना घरघर आणि दम्याचा झटका यासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागू (expert backed measures) शकते. तेव्हा मुलांना सुरक्षित, उबदार आणि आरामदायी वाटण्यासाठी विशेषतः रात्रीच्या वेळी आपण काय करू शकतो हे (preventive care) जाणून घेऊ या...

चांगले कपडे घाला

नवजात आणि लहान मुलांनी चांगले कपडे घातले पाहिजे. त्यांना कमी पण नाही आणि जास्त पण कपडे घातले नाही पाहिजे. तुम्ही स्वतःला गरम ठेवण्यासाठी जितके कपडे घालतात त्यापेक्षा एक जास्त कपडा बाळाला उबदार आणि आरामदायक ठेवण्यासाठी घाला. पलंगाच्या जवळपास काही अतिरिक्त उबदार कपडे देखील ठेवा.

तापमान असावे योग्य

खोलीत आरामदायक उबदारपणा, योग्य प्रमाणात वायू आणि खोली हवेशीर असावी. खिडक्या किंवा दरवाजे उघडले किंवा बंद केले जातात तेव्हा वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी मुलाला दारापासून दूर ठेवा.

बाळाला गुंडाळून ठेवा

बाळाला त्याच्या आकारानुसार उबदार ब्लँकेट किंवा लहान स्लीपिंग बॅगमध्ये गुंडाळणे ही चांगली सवय आहे. अशाने रात्रभर त्यांना उबदार वाटेल. कारण, लहान मुलं बहुतेकदा ब्लँकेट किंवा चादर काढून टाकतात. मोठ्या मुलांना देखील ब्लँकेटमध्ये घट्ट गुंडाळणे आवश्यक आहे. जेणेकरून ते रात्रभर झाकले जातील.

खिडक्या, दारापासून दूर ठेवा

मुलांना स्कायलाइट्स, खिडक्या, पंखे आणि दारे यापासून काही फूट दूर ठेवा. तसेच सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा. जेणेकरून थंड हवा खोलीत प्रवेश करू शकणार नाही. बाळाची त्वचा कोरडी असेल तर आरामदायी आणि हायपरलेर्जेनिक लोशन वापरता येईल.

डोके, हात झाकून ठेवा

बाळाचे डोकं तसेच हात झाकून ठेवा. बोट आणि ओठ गुलाबी आणि उबदार आहेत का हे तपासत रहा. जर ते फिकट किंवा निळसर दिसले आणि स्पर्शास थंड वाटत असेल तर त्यांना उबदार करण्यासाठी ताबडतोब काहीतरी करा.

पलंग आधीपासून गरम करून ठेवा

हिवाळ्यात अंथरूण आधीच उबदार ठेवणे चांगली गोष्ट आहे. लहान मुलाच्या झोपण्यापूर्वी २० ते ३० मिनिटे गरम पाण्याची बाटली किंवा हीटिंग पॅड वापरता येईल. किंवा झोपण्याच्या ३० मिनिटे आधी पलंगाला ब्लँकेटने झाकून टाका. जास्त गरम होणे किंवा भाजणे टाळण्यासाठी बाळ झोपल्यानंतर गरम पाण्याची बाटली काढून टाका.

दारू देणे धोकादायक

मुलांना कधीही ब्रँडी देऊ नका. कारण, अल्कोहोलमध्ये नशा होण्याची क्षमता असते. सर्दीसाठी ब्रँडी किंवा कोगनैकचे सेवन केल्याने मुलांना ॲसिडिओसिस होऊ शकते. अस केल्याने बाळाच्या शरीरातील पीएच पातळी बिघडू शकते आणि यामुळे रक्तातील ॲसिडचे प्रमाण वाढू शकते. मुलांना गरम पाणी, दूध, सूप यासारख्या गोष्टी देऊन शरीर हायड्रेट ठेवा. तसेच त्यांना हलका आणि पौष्टिक आहार द्यावा.

टॅग्स :childrenWinter