Egg Kurma Recipe : ऑम्लेट खाऊन कंटाळलात? मग, यावेळी बनवा अंडा कुर्मा, एकदम सोपी आहे रेसिपी

हिवाळ्यात अंडी खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. या अंड्यांपासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. आज आपण अंड्याचा कुर्मा कसा बनवायचा? ते जाणून घेऊयात.
Egg Kurma Recipe
Egg Kurma Recipeesakal

Egg Kurma Recipe : हिवाळ्यात अंडी खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. या अंड्यांपासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. अंड्याची भुर्जी, अंडाकरी, अंड्याचे ऑम्लेट इत्यादी अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ आपण अंड्यांपासून बनवतो. मात्र, सतत तेच पदार्थ खाऊन अनेकांना कंटाळा येतो.

परंतु, तुम्ही कधी अंड्याचा कुर्मा खाल्ला आहे का? अंड्यापासून बनवली जाणारी ही स्वादिष्ट रेसिपी आहे. अनेकांना ही रेसिपी आवडते आणि काहीतरी वेगळी चव चाखायला ही मिळते. ही डिश तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला ही अंडा कुर्म्याची सोपी रेसिपी कशी बनवायची? त्याबद्दल सांगणार आहोत.

Egg Kurma Recipe
Healthy Breakfast Recipe : नाश्त्यामध्ये बनवा पालक पनीर पराठा, एकदम सोपी आहे रेसिपी

अंडा कुर्मा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • ४-५ अंडी

  • आल्याचे तुकडे

  • तेल

  • हळद – अर्धा चमचा

  • अर्धी वाटी दूध

  • गरम मसाला – १ चमचा

  • २-३ कांदे – बारीक चिरलेले

  • ३-४ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

  • लसणाच्या पाकळ्या (३-४)

  • काजू (४-५)

  • वेलची

  • धनेपूड

  • चवीनुसार मीठ

अंडा कुर्मा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी कुकरमध्ये किंवा एका पातेल्यात अंडी उकडून घ्या.

  • अंडी उकडल्यानंतर त्याची साले काढून घ्या.

  • त्यानंतर, मिक्सरच्या भांड्यात आले, लसूण, हिरव्या मिरच्या, वेलची आणि काजू टाकून मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घ्या.

  • आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल घाला.

  • आता या गरम तेलात कांदा, हळद आणि मीठ टाकून चांगले परतून घ्या.

  • आता या मिश्रणात बारीक केलेले वाटण, अर्धी वाटी दूध टाकून हे संपूर्ण मिश्रण तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्या.

  • त्यानंतर, या मिश्रणात थोडे पाणी घालून मंद आचेवर हा अंडा कुर्मा शिजू द्या.

  • या मिश्रणाला थोडी उकळी आल्यानंतर अंडी अर्धा कापून त्यात शिजायला टाका.

  • १५ ते २० मिनिटांनंतर तुमचा अंडा कुर्मा तयार आहे.

  • आता या डिशला कोथिंबीरने सजवा आणि गरमागरम चपाती, रोटी किंवा भातासोबत खायला घ्या.

Egg Kurma Recipe
Soyabean Tikka Recipe : सोयाबीनची ‘ही’ डिश चाखल्यानंतर तुम्हाला मांसाहाराची आठवण नाही येणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com