Radish Chutney : हिवाळ्यात अशा पद्धतीने बनवा मूळ्याची चटणी, एकदम सोपी आहे रेसिपी

हिवाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळे मार्केटमध्ये येतात. या भाज्यांमध्ये मटार, गाजर, मूळा, हरभरा, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश असतो.
Radish Chutney
Radish Chutneyesakal

Radish Chutney : हिवाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळे मार्केटमध्ये येतात. या भाज्यांमध्ये मटार, गाजर, मूळा, हरभरा, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश असतो. यासोबतच अनेक प्रकारची फळे देखील मार्केटमध्ये येतात.

या थंडीच्या दिवसांमध्ये मूळा खाणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. मूळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. मूळ्याचा वापर हा प्रामुख्याने सॅलेडमध्ये आणि पराठ्यामध्ये केला जातो.

मूळ्यामध्ये आढळून येणाऱ्या पोषकघटकांमुळे मूळ्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते. थंडीच्या दिवसांमध्ये मूळा आवर्जून खायला हवा. मूळ्याचे सॅलेड, मूळ्याचे थालीपीठ आणि पराठे आवर्जून बनवले जातात. हे चवीला ही उत्तम लागतात.

Radish Chutney
Healthy Breakfast Recipe : नाश्त्याला बनवा रव्याचा कुरकुरीत मेदूवडा, एकदम सोपी आहे रेसिपी

परंतु, मूळ्यापासून स्वादिष्ट चटणी देखील बनवली जाते. हे तुम्हाला माहित आहे का? आज आपण मूळ्याची चटणी कशी बनवयाची ? हे जाणून घेऊयात.

मूळ्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • १ मूळा

  • ३-४ हिरव्या मिरच्या

  • लसणाच्या पाकळ्या ४-५

  • कोथिंबीर

  • चवीनुसार मीठ

  • लिंबाचा रस १ चमचा

मूळ्याची चटणी बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • सर्वात आधी मूळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

  • मूळा धुवून घेतल्यानंतर त्याची साल काढा आणि मूळ्याचे बारीक तुकडे करा.

  • दुसऱ्या बाजूला कोथिंबीर धुवून घेऊन ती बारीक चिरा.

  • आता मूळ्याचे बारीक तुकडे आणि चिरलेली कोथिंबीर एकत्रितपणे मिक्सरला बारीक करून घ्या.

  • आता या वाटणामध्ये लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस आणि मीठ टाका. त्यानंतर, पुन्हा मिक्सरला हे मिश्रण बारीक करून घ्या.

  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये पाणी देखील मिक्स करू शकता.

  • आता तुमची मूळ्याची स्वादिष्ट चटणी तयार आहे.

Radish Chutney
Amla Halwa : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यात खा आवळ्याचा हलवा, सोपी आहे रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com