थोडक्यात:मोबाईल पावसात भिजल्यास तो त्वरित बंद करा आणि चार्जिंगपासून दूर ठेवा.सिम कार्ड, कव्हर काढून मोबाईल कोरड्या कापडाने पुसा आणि तांदळात ठेवा.मोबाईल सुरू न झाल्यास अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये तांत्रिक मदत घ्या..Phone Care During Rain: आजच्या डिजिटल युगात जवळजवळ प्रत्येकजण स्मार्टफोन वापरत आहे. सध्या राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार, रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहे. अशा वेळी अनेक जण बाहेर जाताना छत्री. रेनकोट खरेदी करतात..मोबाईल पावसात भिजल्यास काय करावे, हे अनेकांना माहिती नसते. मात्र, काळजी करण्याची गरज नाही खाली दिलेले हे सोपे उपाय जरूर वापरून पाहा..World Photography Day 2025 : फोटोग्राफी दिनानिमित्त, जगाला नव्या दृष्टीने पाहणाऱ्या मित्रांना आज खास शुभेच्छा पाठवा!.या सोप्या उपायांचा वापर करा1. मोबाईल त्वरित बंद करापावसात मोबाईल भिजल्यावर पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो तत्काळ बंद करा. मोबाईल सुरू ठेवल्यास त्यातील इलेक्ट्रॉनिक सर्किट्सना धोका निर्माण होतो आणि शॉर्टसर्किट होण्याची शक्यता वाढते.2. मोबाईल भिजल्यास लगेच चार्ज करू नकामोबाईल पाण्यात भिजल्यानंतर तो कधीही तात्काळ चार्ज करू नका. हे केल्याने मोबाईलच्या इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये शॉर्टसर्किट होऊ शकतो, आणि त्यामुळे मोबाईल कायमचा बंद पडण्याचा धोका असतो.3. सिम कार्ड, मेमरी कार्ड आणि कव्हर काढामोबाईलचे बॅक कव्हर, सिम कार्ड, मेमरी कार्ड आणि इतर हटवता येणारे भाग तात्काळ काढा. यामुळे पाणी आत अडकणार नाही आणि कोरडे करणे सोपे जाईल..4. कोरड्या कापडाने स्वच्छ पुसामोबाईलवर लागलेले पाणी कोरड्या आणि मऊ कपड्याने (उदा. सुती रुमाल) अलगद पुसून टाका. पाणी पुसताना मोबाईल अधिक हालवू नका, त्यामुळे पाणी आत खोल जाऊ शकते.5. राईस ट्रिक वापरून पहामोबाईल भिजल्यावर घरगुती उपाय म्हणून कोरड्या तांदळात मोबाईल २४-४८ तास ठेवता येतो. तांदूळ नैसर्गिकरित्या आर्द्रता शोषतात, त्यामुळे मोबाईल कोरडा होण्यास मदत होते. मोबाईल पूर्णपणे बंद ठेवूनच हा उपाय करा.6. तांत्रिक मदत घ्यावरील सर्व उपाय करूनही मोबाईल सुरू होत नसेल, तर तो अधिकृत सर्व्हिस सेंटर मध्ये घेऊन जाणे उत्तम. तेथे योग्य उपकरणे आणि तज्ज्ञ तांत्रिक मदतीने तुमचा मोबाईल दुरुस्त केला जाऊ शकतो..Bombay High Court Recruitment 2025: मुंबई उच्च न्यायालयात पर्सनल असिस्टंट पदासाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि किती मिळेल पगार .FAQs1. पावसात मोबाईल भिजला तर तो लगेच का बंद करावा? (Why should I turn off my phone immediately after it gets wet in the rain?)कारण मोबाईल सुरू ठेवल्यास शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते.2. भिजलेला मोबाईल तांदळात किती वेळ ठेवावा? (How long should I keep a wet phone in rice?)मोबाईल किमान २४ ते ४८ तास कोरड्या तांदळात ठेवावा.3. मोबाईल भिजल्यावर लगेच चार्जिंगला लावायला हरकत आहे का? (Is it safe to charge a wet phone immediately?)नाही, कारण चार्ज केल्यास सर्किट्सना कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.4. घरी उपाय करूनही मोबाईल चालू झाला नाही, मग काय करावे? (What should I do if the phone doesn’t start after trying home remedies?)मोबाईल अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये तपासणीसाठी दाखवा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.