Smoking Habit | धूम्रपान काही केल्या सोडवत नाहीये ? हे उपाय करून पाहा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smoking Habit

Smoking Habit: धूम्रपान काही केल्या सोडवत नाहीये ? हे उपाय करून पाहा...

मुंबई : 'धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे', हे आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि आपण सर्वांनी सिगारेटच्या पाकिटावरील कॅन्सरचे चित्रदेखील पाहिलेले असते; परंतु तरीही सिगारेट ओढणाऱ्यांच्या मानसिकतेत काहीही फरक पडत नाही.

सिगारेट ओढण्याचं व्यसन लागणं खूप सोपं आहे, पण या व्यसनापासून मुक्ती मिळणं खूप अवघड आहे आणि त्यामुळे दीर्घकाळ शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.

एका संशोधनातून समोर आले आहे की, भारतात सुमारे २६७ दशलक्ष तंबाखू वापरकर्ते आहेत आणि इतका तंबाखू खाणारा हा जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे.

१५ वर्षांवरील १०० दशलक्षाहून अधिक लोक सिगारेट ओढतात आणि धूम्रपानामुळे त्रासलेले असतात. हा फक्त भारताचा आकडा आहे आणि जर संपूर्ण जगाचा विचार केला तर तो किती असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही.

एकदा तुम्हाला सिगारेट ओढण्याचे व्यसन लागल्यानंतर तुमचे आयुष्य १८% पेक्षा जास्त कमी होते. फुप्फुसाच्या कर्करोगाचे सर्वात मोठे कारण म्हणजे सिगारेट ओढणे.

केवळ धूम्रपान करणाऱ्यांनाच धोका नसतो, तर धूम्रपान न करणाऱ्यांनाही धोका असतो जे फक्त सेकंडहँड स्मोक घेतात.सिगारेटचे व्यसन सोडणे सोपे नाही, परंतु काही गोष्टींची काळजी घेतल्यास हळूहळू ते कमी करता येते. हेही वाचा - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

१. तुमच्या आजूबाजूला वातावरण तयार करा आणि 'स्टे क्विट' वर लक्ष केंद्रित करा

तुमचे ध्येय धूम्रपान सोडणे हे आहे आणि जोपर्यंत तुम्हाला सर्व बाजूंनी त्याचा दबाव जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही सहजासहजी धूम्रपान सोडू शकणार नाही.

तुम्ही उचललेले पहिले पाऊल म्हणजे तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे वातावरण तयार करा जे तुम्हाला धूम्रपान सोडण्याची प्रेरणा देईल. एकाच वेळी खूप मोठे लक्ष्य ठेवू नका, हळूहळू प्रयत्न करा.

२. फोन आणि अॅप्सची मदत घ्या

फोनच्या मदतीने सिगारेटचे व्यसन सोडले जाऊ शकते. अनेक अॅप्स या कामात मदत करतात. सिगारेटपासून मुक्ती मिळवण्यासाठी या अॅप्सचा वापर केला जाऊ शकतो. तुमच्या सोयीनुसार अनेक प्रकारचे अॅप्स उपलब्ध आहेत.

३. वैद्यकीय मदत घ्या

अनेक पुनर्वसन शिबिरे आहेत ज्यांची मदत घेतली जाऊ शकते. आपण वैद्यकीय मदत घेऊ शकता आणि तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी, डॉक्टर काही औषधे देखील लिहून देऊ शकतात. यासाठी तुम्ही नॉर्मल फिजिशियनपासून सायकॉलॉजिस्टपर्यंत सर्वांशी बोलू शकता.

४. जेव्हा तुम्हाला धूम्रपान करावेसे वाटेल तेव्हा छंद जोपासा.

जर तुम्हाला धूम्रपान करण्याची तीव्र इच्छा असेल तर त्याऐवजी एखादा छंद सुरू करता येईल.

५. पुदिना खा

ज्याप्रमाणे धूम्रपान करण्याची इच्छा झाल्यावर च्युइंग गम मदत करते, त्याचप्रमाणे मिंट खाल्ल्यानेही फायदा होतो. पेपरमिंट कँडी नेहमी आपल्यासोबत ठेवा. जेव्हा तुम्हाला धूम्रपान करावेसे वाटेल तेव्हा तुम्ही त्या गोळ्या घेऊ शकता.

६. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी वापरून पाहा

जर तुम्हाला सिगारेट ओढण्याची खूप सवय असेल तर तुम्ही निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी करून पाहू शकता. यामुळे तुमची सिगारेट ओढण्याची सवय पूर्णपणे कमी होऊ शकते.

ही निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी धूम्रपान सोडल्यामुळे होणारी चिंता आणि तणाव दूर करण्यास मदत करू शकते. हे करण्याआधाी प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सूचना - या लेखातील माहिती सामान्य ज्ञानासाठी असून कोणत्याही प्रकारच्या औषधोपचारांसाठी कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टॅग्स :Cancerbodysmoking