

Skincare Label Guide
sakal
DERMATOLOGIST SKINCARE TIPS: नवं स्किनकेअर प्रॉडक्ट घेताना आपण अनेकदा ब्रँड, पॅकेजिंग किंवा त्यावर लिहिलेल्या ‘Glow’, ‘Natural’, ‘Dermatologically Tested’ अशा शब्दांकडे आकर्षित होतो. पण सर्वात जास्त महत्त्वाचं असतं ते प्रॉडक्टच्या लेबलवर लपलेलं! त्यात कोणते घटक आहेत, त्यांचं प्रमाण किती आहे आणि ते तुमच्या त्वचेसाठी योग्य आहेत की नाही, हे समजून घेणंही खूप गरजेचं आहे. त्यामुळे पुढच्या वेळी स्किनकेअर प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांप्रमाणे लेबल वाचण्याच्या या ५ गोष्टी नक्की तपासा.