Face Care : चेहऱ्यावर वांग किंवा डाग दूर करायचेय? असा करा तुरटीचा वापर

तुम्हाला तुरटीचे आणखी फायदे माहिती आहे का?
Face Care
Face Caresakal

पावसाळ्यात गढूळ झालेले पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी पाण्यात फिरविली जाते. पण तुम्हाला तुरटीचे आणखी फायदे माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया.

हेही वाचा - Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

ताप, खोकला व दमा सारख्या रोगांवर

वातावरणातील बदलामुळे ताप, खोकला, दमा यासारख्या समस्या डोके वर काढू लागल्या आहेत. या समस्यांच्या सुरुवातीच्या काळातच रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये १० ग्रॅम खडी साखर व 2 चिमूट तुरटीची पूड एकत्र करून घ्यावी. यामुळे चांगलाच आराम पडतो.

तोंड व दातांवरील समस्येवर रामबाण औषध

एक ग्लास गरम पाण्यात चिमूटभर मीठ व एक लहानसा चमचा तुरटी पावडर घालून मिक्स करावे. हे पाणी गार झाल्यावर या पाण्याने गुळण्या केल्यास दातावरील किड कमी होते. शिवाय तोंडाला एक प्रकारची दुर्गंधी येत असल्यास ती हळूहळू नाहीशी होऊन तोंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Face Care
Face Beauty : आंघोळीच्या आधी या गोष्टी चेहऱ्याला लावल्यास सौंदर्य उजळेल

आखडलेल्या मांसपेशीवर उपयुक्त

बऱ्याच जणांना मांसपेशी आखडण्याची समस्या भेडसावीत असते. अशावेळी तुरटी आणि हळदीची पूड एकत्र करून आखडलेल्या मांसपेशीवर लावल्यास आराम मिळतो.

चेहऱ्यावरील त्वचा उजळविण्यासाठी

तुरटीची पूड करून त्यात थोडे गुलाबजल टाकून, त्याची दाटसर पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहरा धुवून त्यावर लावावी. १०-१५ मिनिटे ठेवून मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकावा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास तुमची त्वचा उजळलेली दिसेल. शिवाय चेहऱ्यावर वांग किंवा डागाची समस्या असल्यास ते देखील या वापराने दूर होतात

Face Care
Face Beauty : आंघोळीच्या आधी या गोष्टी चेहऱ्याला लावल्यास सौंदर्य उजळेल

नितळ पायांसाठी

बऱ्याच जणांचे पाय काळवंडलेले आणि त्यावरील त्वचा फाटलेली असते. अशावेळी कोमट पाण्यात तुरटी फिरवून त्या पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय बुडवून ठेवल्यास पायांच्या त्वचेमध्ये चांगलाच फरक झालेला दिसून येतो.

केसांच्या समस्येवर उपयुक्त

बऱ्याचदा शाळेत जाणाऱ्या मुलींमध्ये डोक्यात उवा निर्माण होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी हे तुरटी मिश्रित तेल लावल्याने उवांचा नायनाट होतो आणि सतत डोक्याला खाज निर्माण होण्याच्या समस्येपासून सुटकारा मिळतो.

डॉ अमित भोरकर

न्युट्रिशनिस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com