Kitchen Hacks | प्लॅस्टिकच्या डब्यातील तेल अन् हळदीचे डाग निघत नाहीयेत? ट्राय करा सोप्या ट्रिक्स | Tips to Remove Oil & Turmeric stains from plastic jars | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tips to Remove Oil & Turmeric stains from plastic jars

अनेकदा आपण स्वयंपाकघरात प्लास्टिकचे डबे वापरतो, पण कधी कधी त्या डब्यातील तेल अन् हळदीचे डाग तसेच राहतात. प्लॅस्टिकच्या डब्यातील डाग सहजपणे काढून टाकण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत चला तर मग त्या जाणून घेऊयात. (Tips to Remove Oil & Turmeric Stains from Plastic Jars)

प्लॅस्टिकच्या डब्यातील तेल अन् हळदीचे डाग निघत नाहीयेत?

अनेकदा तुम्ही स्वयंपाकघरात प्लॅस्टिकचे डबे वापरता, पण कधी कधी हे डबे खराब होतात आणि त्यावरील डाग दूर होत नाहीत, तेव्हा तुम्ही ते फेकून देता. चला तर मग एक सोपा उपाय पाहूयात ज्याद्वारे तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्यातील हळद आणि तेलाचे डाग सहज काढू शकता. (Tips to Remove Oil & Turmeric Stains from Plastic Jars)

बेकिंग सोडा (Baking Soda)

तेलामुळे प्लॅस्टिकच्या डब्यात चिकटपणा खूप जास्त होतो आणि त्यामुळे त्यातील डाग जात नाही. अशावेळी बेकिंग सोडा पेस्ट वापरता येईल. यासाठी पाण्यात थोडासा बेकिंग सोडा मिसळा आणि प्लॅस्टिकच्या डब्याच्या त्या डागावर 30 मिनिटे राहू द्या. असे केल्याने त्या प्लॅस्टिकच्या डब्यातील डाग निघून जातील.

मीठाने (Salt) स्वच्छ करा

तेल आणि चिकटपणा काढून टाकण्यासाठी मीठ देखील वापरले जाऊ शकते. कोमट पाण्यात एखादा नॅपकीन बुडवून त्यात मीठ टाकून प्लॅस्टिकच्या डब्यातील त्या डागावर चोळा. जर डाग पूर्णपणे काढून टाकला नाही तर आपण ही प्रक्रिया पुन्हा करू शकता.

हॅंन्ड सॅनिटायजर (Hand Sanitizer)

तुम्ही अल्कोहोल घासून प्लॅस्टिकच्या डबा स्वच्छ करू शकता. डाग असलेल्या जागेवर हँड सॅनिटायझर लावा आणि 2 मिनिटे राहू द्या. त्यानंतर भांडे स्वच्छ करा.

व्हाईट व्हिनेगर (White Vinegar)

1 कप पाण्यात 1 टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर टाका आणि थोडा वेळ प्लास्टिकच्या डब्यात ठेवा. यानंतर प्लास्टिकचे कंटेनरला नार्मल धुवून घ्या.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपाय आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

loading image
go to top