थंडीसोबत होणारा सर्दी व त्यातून होणारे गंभीर आजार टाळण्यासाठी घरगुती उपाय व योग उपयुक्त ठरू शकतो. सर्वसाधारणपणे थंडी सुरू झाली की बहुतेकांना सर्दी- पडसे हमखास होते. नाक गळू लागते, शिंका येतात..पुढे कफ बाहेर पडू लागतो. खोकला, ताप व अंगदुखीचा त्रास होतो. अलीकडे साधी सर्दीही लवकर बरी होत नाही. अनेक दिवस औषधे घ्यावी लागतात..Winter Healthy Yoga: सर्दी, ताप, अन्य आजारांवर करा 'या' आसनांचा सराव, राहाल निरोगी.सर्दी घशात उतरली की खोकला, पुढे श्वासनलिकेत गेली की ब्रॉकायटीस व फुफ्फुसात गेली की न्यूमोनिया असे अधिकाधिक गंभीर आजार होतात. काही जणांना दमा व क्षयरोगासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. थंडीत होणारी सर्दी लक्षात घेऊन काही घरगुती व काही योगाद्वारे उपाय करता येतात. त्यामुळे लवकरचे उपाय करून गंभीर आजार टाळता येतील..काय करता येईल?- सर्वप्रथम रेचक काही दिवस घ्यावे, ज्याने पोट साफ होईल. याने कफही ढिला होऊन लवकर बाहेर पडेल.- रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण एक चमचा कोमात पाण्यासोबत घ्यावे.- दिवसभर कोमट पाणी प्यावे.- सकाळी उठताच गरम पाणी प्यावे.- थंडीपासून बचाव करणारे उबदार कपडे अंगभर घालावेत.- कान रुमालाने किंवा पट्टीने झाकावेत- दही, आंबट, तेलकट/तळलेले व थंड पदार्थ खाऊ नयेत.- शक्यतो जेवण घरीच करावे.- मिठाच्या कोमट पाण्याने दोन वेळा गुळण्या कराव्यात.- रात्री झोपण्यापूर्वी हळद पाण्यात उकळून थोडे मीठ व आले घालून प्यावी.- फक्त पाण्याची वाफ नाकातोंडाने काही वेळ घ्यावी.- तुळशीची पाने, आले, हळद, दालचिनी, पुदिना, लवंग यांचा काढा करून दोन वेळा घ्यावा.- नाकातोंडावर मास्क लावावा..उपयुक्त योगासनेयासोबत काही योगासने, ज्यांच्यात डोके खाली व पाय वर राहतील अशी आसने करावीत. उदा.- सर्वांगासन, शीर्षासन, हस्तपादासन, योगमुद्रा, उत्तानपादासन, विपरीत करणी आदी. यामध्ये डोके व छाती खाली राहते. त्याच्या मध्ये रक्तप्रवाह वाढतो. कफ पातळ होऊन बाहेर पडतो.प्राणायाम व जलनेतीप्राणायामाचा खूप फायदा होतो. कपालभाती, भस्रिका, नाडीशोधन दिवसातून तीन वेळा करावेत. यामुळे श्वासमार्ग मोकळा राहतो व सर्दी, कफ लवकर बाहेर पडतो. भ्रामरी केल्याने कान, नाक, घसा स्वच्छ होतात. त्याचे आरोग्य सुधारते. शिवाय सायनसेस जवळ नायट्रिक ऑक्साईड तयार होते, त्यामुळे जंतूंचा (viruses) नाश होतो. याचा कोरोनामध्येही फार उपयोग होतो. जलनेती ही श्वासमार्ग, विशेषतः सायनस मोकळे करते. श्वासाचे रोग होत नाहीत..थंडी सुरू झाली की सर्दीच्या तक्रारी वाढतात. पण काही सोपे प्रतिबंधात्मक उपाय, योग व प्राणायामाचा उपयोग करून सर्दीपासून मुक्तता मिळू शकते.- मनमोहन भुतडा, योगाचार्य, योग थेरपिस्ट, संस्थापक, योग सेवा मंडळ व योग असोसिएशन, सोलापूर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.