
Delhi Auto Expo 2025 Marathi news : दिल्लीतील प्रगती मैदान इथं सुरु असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल ऑटो एक्स्पोमध्ये अनेक कंपन्यांनी आपली नवी वाहनं लॉन्च केली आहेत. यामध्ये आत्तापर्यंत ९० वाहनं लॉन्च झाली असून पहिल्याच दिवशी मारुती ई-वितारा आणि ह्युंदाईची क्रेटा इलेक्ट्रिक लॉन्च करण्यात आली होती. त्यानंतर आता ह्युंदाईनं शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या कारची झलक दाखवली आहे. कंपनीनं सध्या या कारचं केवळ प्रोटोटाईम लॉन्च केलं आहे.