Arranged Marriage : या वर्षी तुम्हीही अरेंज मॅरेज करताहेत? 'या' पाच गोष्टी समजून घ्या नाहीतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arranged Marriage

Arranged Marriage : या वर्षी तुम्हीही अरेंज मॅरेज करताहेत? 'या' पाच गोष्टी समजून घ्या नाहीतर...

Arranged Marriage : लग्न हे एक असं बंधन आहे ज्यामध्ये दोन व्यक्तीसह दोन कुटूंब एकत्र येतात. नवरा बायकोच्या या नात्यात प्रेम, काळजी अन् स्नेह असते. काही लोक लव्ह मॅरेज करत आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकतात तर काही लोक अरेंज मॅरेज करतात.

अरेंज मॅरेज करणाऱ्या लोकांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो कारण अरेंज मॅरेज ही लव्ह मॅरेज सारखी सोपी नसते. अरेंज मॅरेज करणाऱ्यांना काही गोष्टींशी तडजोड तर काही गोष्टी समजून घ्यावा लागतात.

जर तुम्हीही या वर्षी अरेंज मॅरेज करत असाल तर काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया. (if you are doing Arranged Marriage try to understand these things )

प्रेम हळू हळू होतं

अरेंज मॅरेज मध्ये दोन्ही पार्टनरमध्ये प्रेम लवकर होत नाही. त्यांची बॉंडीग स्ट्रॉंग व्हायला वेळ लागतो. दोघांना एकमेकांना समजून घ्यायला वेळ लागतो. अरेंज मॅरेजमध्ये प्रेम हे एका कमिटमेंटसारखे असते.

लग्नानंतर सुख असो की दु:ख एकमेकांना साथ द्यावा लागतो. प्रत्येक वेळी त्या अनोळखी व्यक्तीसोबत उभं राहावं लागतं ज्याला तुम्ही काही महिन्यापूर्वीच भेटले आहात. अशात केव्हा या दोघांमध्ये प्रेम होतं, हे कळतच नाही.

चेहरा नाही तर मन आवडायला हवंं

समजा की एक सुंदर मुलासोबत किंवा मुलीसोबत तुमचं लग्न झालंय. त्यांचा चेहरा तुम्हाला किती दिवस आकर्षित करणार? एक वर्ष, दोन वर्षे किंवा जास्तीत जास्त पाच वर्षे. काही काळानंतर तुम्हाला त्यांचा स्वभाव कळणार जो अत्यंत त्रासदायक असू शकतो.

अशात हे समजून घेणे गरजेचे आहे की अरेंज मॅरेज टिकवायचं असेल तर चेहरा नाही तर मन किंवा स्वभाव बघावा.

आईवडिल तुमचं चांगलंच व्हावं, असा विचार करतात

आयुष्य आणि लग्न या दोन गोष्टीत आपल्या आईवडिलांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव असतो. आपण ज्यामध्ये आपले नवे पावले टाकत आहोत.

अशात ते चांगल्याने समजतात की आपल्यासाठी काय चांगले आणि काय चुकीचं आहे. ते आपले हितचिंतक असतात अन् खरे मार्गदर्शक असतात.

अरेंज मॅरेजही रोमँटीक असू शकते

लव मॅरेजमध्येच नाही तर अरेंज मॅरेज मध्येही रोमांस असू शकतो. मात्र या रोमांस ला शब्दात व्यक्त केले जाऊ शकत नाही. अशात हळू हळू तुम्ही तुमच्या जीवनसाथीविषयी जाणून घेता. प्रत्येक दिवस एक सरप्राइज प्रमाणे असतं.

सुरवातीला अनोळखी असणारं नातं नंतर मैत्रीत रुपांतर होतं. अरेंज मॅरेजमध्ये रोमांसची एक वेगळी भाषा असते जी वेळेनुसार समजण्यास सोपी जाते.

एडजस्टमेंट शिवाय कोणतंच नातं टिकत नाही

लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज तुम्हाला पार्टनरसोबत एडजस्टमेंट करावंच लागतं. एवढंच नाही तर तुम्हाला तुमच्या कुटूंबासोबतही तालमेळ ठेवावा लागतो. सक्सेसफुल मॅरिजमध्ये एक व्‍यक्ति दूसऱ्या व्‍यक्तिला कोणत्याही अटीत प्रेम करतो आणि साथ देतो.