Valentine Day 2023:'ती मागे वळून पाहणार माहिती होतं,तेवढ्यात..',अशी सुरु झाली अशोक मामांची भन्नाट Love story

'मामला पोरीचा' सिनेमाच्या सेटवर एक खास क्षण असा आला की ज्यामुळे निवेदिता आणि आपल्यात काहीतरी नक्कीच आहे याची जाणीव पहिल्यांदा अशोक सराफ यांना झाली.
Valentine Day 2023: Ashok Saraf & Nivedita Saraf Love Story
Valentine Day 2023: Ashok Saraf & Nivedita Saraf Love StoryEssakal

Ashok Saraf & Nivedita Saraf Love Story: मनोरंजन सृष्टीत रील लाइफ जगताना अनेक कलाकार रिअर लाइफमध्येही एकमेकांच्या प्रेमात पडतात..मनं जुळतात..अन् अनेकदा त्याचं रुपांतर लग्नात होतं. पण हेच नातं बऱ्याचदा दिसून आलंय की अवघ्या काही वर्षात तुटतं देखील. पण काही इंडस्ट्रीतील जोडपी अशी आहेत की त्यांच्या प्रेमाची..नात्याची दाद द्यावी अन् आवर्जुन त्यांचा उल्लेख करावा अशी.

असंच एक नातं आहे मराठीती दिग्गज कलाकार अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचे. दोघांमध्ये खरंतर वयाचं मोठं अंतर पण आज या जोडप्याकडे पाहिलं की नक्कीच वाटतं प्रेम करावं तर असं..अन् संसार फुलवावा तो ही यांच्यासारखाच.

आज इतक्या वर्षाच्या त्यांच्या संसारानंतरही त्यांच्यातील प्रेम त्यांच्या वयासारखंच एव्हरग्रीन आहे बरं का...आज व्हॅलेंटाईन डे निमित्तानं चला जाणून घेऊया नेमका यांच्या प्रेमाचा किस्सा सुरु कसा झाला.

Valentine Day 2023: Ashok Saraf & Nivedita Saraf Love Story
Apurva Nemlekar: 'माझ्या सगळ्या मैत्रिणींना मुलंही झाली आणि मी अजून फक्त..',अपूर्वाच्या मनात काय सलतंय?

आपल्यापैकी काहीजणांना माहित असेल की निवेदिता सराफ-अशोक सराफ यांच्यात प्रेम फुललं ते 'नवरी मिळे नवऱ्याला' या सिनेमाच्या सेटवर,तर कुणाला माहित असेल 'ब्रम्हचारी' सिनेमाच्या सेटवर तर कुणाला आणखी काही. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते अशोक सराफ यांना निवेदिता यांच्यावर आपलं प्रेम आहे याची नेमकी जाणीव कधी झाली या खास क्षणा विषयी..

हो खास क्षण म्हटलं कारण खुद्द अशोक सराफ यांनीच एका मुलाखतीत तो खास क्षण शेअर केला होता जेव्हा त्यांच्या मनात निवेदिता यांना पाहून प्रेमाची घंटी वाजली होती. बरं,'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सिनेमात काजोल निघून जात असताना कसा शाहरुख म्हणतो, जर हिचं माझ्यावर प्रेम असेल तर ही नक्की वळून बघेल आणि 'पलट..पलट..'म्हणतो.. अगदी तसाच सीन आधीच अनेक वर्अष घडून गेलाय शोक सराफ-निवेदिता सराफ यांच्या आयुष्यात.

Valentine Day 2023: Ashok Saraf & Nivedita Saraf Love Story
Tollywood: 'चुकूनही विजय थलपतीच्या 'लिओ' सिनेमाचे फोटो -व्हिडीओ शेअर करु नका..नाहीतर..', वाचा

त्याचं झालं असं की, निवेदिता या अशोक सराफ यांना त्यांच्या लहानपणापासून ओळखत होत्या. त्या ६ वर्षांच्या असताना अशोक सराफ यांचा पहिला सिनेमा आला होता. निवेदिता यांच्या वडीलांचे अशोक सराफ खास मित्र. त्यामुळे तशीही ओळख होतीच.

निवेदिता या अशोक सराफ यांना 'अशोकजी' म्हणायच्या. पुढे सिनेमात काम करायला लागल्यानंतर अशोक सराफ-निवेदिता अनेकदा भेटायचे. पुढे 'मामला पोरीचा' सिनेमात दोघांना कास्ट केलं गेलं. तेव्हा त्या शूटवेळी निविदितांचे पॅकअप झालं.

यावेळचा तो खास क्षण शेअर करताना अशोक सराफ म्हणाले,''पॅकअफ झाल्यावर निवेदिता मला बाय म्हणाली, त्यावेळी ती निघून जात असताना मला वाईट वाटलं पण मी ते चेहऱ्यावर दिसू दिलं नाही''.

Valentine Day 2023: Ashok Saraf & Nivedita Saraf Love Story
'Rajesh Khanna-अंजू महेंद्रू यांचे ब्रेकअप माझ्यासाठी मोठा धक्का होता', 75 वर्षाच्या मुमताजचा मोठा खुलासा

''ती जात असतामा माझ्या डोक्यात आलं कि समोर असलेल्या लाकडाच्या चौकटीच्या इथे गेल्यावर ती आपल्याकडे वळून पाहिल आणि तसंच झालं. तेव्हाच माझी खात्री पटली काहीतरी आपल्यात नक्कीच आहे''.

''आणि तोच खास क्षण ज्यानं मला निवेदिता प्रती माझ्या मनात असलेल्या प्रेमाची जाणीव करून दिली. पुढे 'नवरी मिळे नवऱ्याला' सिनेमाच्या सेटवर मग आम्ही ते प्रेम स्विकारलं आणि 'ब्रह्मचारी' सिनेमाच्या सेटवरनं अचानक गोवा गाठून तिथल्या मंगेशीच्या देवळात लग्नगाठ बांधली''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com