प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये राहताय? मग 'या' गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये राहताय?

प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये राहताय?

कोणत्याही ठिकाणी आपण फिरायला गेलो की तिथे हॉटेल किंवा होम स्टे यांना राहण्यासाठी पसंती देतो. जर आपला दौरा ३-४ दिवसांचा किंवा आठवड्याभराचा असेल तर सहाजिकच आपल्याला त्यानुसार, राहण्याची व्यवस्था करावी लागते. कारण, दिवसभर फिरुन आल्यानंतर रात्री शांत झोप मिळावी किंवा मन:शांती मिळावी अशीच प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, कोणत्याही हॉटेल किंवा अन्य ठिकाणी राहण्यापूर्वी त्या ठिकाणाची, जागेची पूर्ण माहिती करुन घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे हॉटेल बुक करण्यापूर्वी आणि प्रत्यक्षात तिथे राहायला गेल्यावर कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी हे पाहुयात. (if you stay in hotel during the journey keep this)

हेही वाचा: आता घरीच करा करोनाची चाचणी

१. हॉटेलमध्ये गेल्यावर प्रथम तुम्ही निवडलेली संपूर्ण खोली, रुम व्यवस्थित पाहून घ्या.

२. पलंग, बेडशीट, टॉवेल, नॅपकिन किंवा अनेय गरजेच्या वस्तू व्यवस्थित आहेत की नाही ते तपासा.

३. जर रुममधील एखादी वस्तू खराब किंवा वापरलेली असेल तर त्वरीत ती गोष्ट हॉटेल स्टाफच्या लक्षात आणून द्या.

४. रुममध्ये गेल्यावर प्रथम सगळ्याचा फोटो काढावा. कारण, चेक आऊट करतांना हॉटेल स्टाफला जर रुममधल्या एखाद्या वस्तूचं नुकसान झाल्याचं आढळून आलं. तर ते तुमच्याकडून दंड आकारु शकतात. अशा वेळी तुम्ही पुरावा म्हणून तुमच्या मोबाईलमध्ये काढलेले फोटो दाखवू शकता.

५. रुममधील प्रत्येक वस्तू निर्जंतुक करण्यात आली आहे की नाही ते विचारुन घ्या.

६. मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी रुममध्ये देण्यात येणारा लॉकर खरंच सेफ आहे का ते तपासून पाहा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Tourisim
loading image
go to top