
आता घरीच करा करोनाची चाचणी
कोरोना विषाणूचा वाढता प्रकोप वेळीच थांबवायचा असेल तर आजाराचं निदान आणि त्यावरील उपचार वेळीच करणं गरजेचं आहे. प्रशासनाकडूनदेखील सातत्याने नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. परंतु, या चाचणीचे रिपोर्ट येण्यासाठी २४ तासांचा अवधी लागत आहे. तसंच अनेक जणांना कोरोना चाचणी करण्यासाठी शहरात किंवा अन्य दुसऱ्या गावांमध्ये जावं लागत आहे. म्हणूनच, नागरिकांची होत असलेली गैरव्यवस्था लक्षात घेता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) होम टेस्ट कीटला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता नागरिक घरबसल्या कोरोना चाचणी करु शकतात. मात्र, ही चाचणी करण्यापूर्वी काही नियम व अटींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) नवीन गाईडलाईन जारी केली आहे. (health covid home test kit gets approval guidelines out on who should use)
ICMRने मान्यता दिलेल्या या कीटचं नाव कोविसेल्फ टीएम (CoviSelfTM) असं आहे. पुण्यातील Mylab Discovery Solutions Ltd या कंपनीने हा कीट तयार केला असून ICMR ने रॅपिड अँटीजन टेस्टसाठी या कीटला मंजुरी दिली आहे. या कीटच्या माध्यमातून नागरिक घरीच नाकातील द्रवाचे सॅम्पल घेऊ शकतात. त्यानंतर या सॅम्पलचा फोटो कंपनीला पाठवावा लागेल. मात्र, त्यासाठी प्रत्येकाला एक अॅप डाउनलोड करावं लागेल.
हेही वाचा: Video : ...तर होणार नाही म्युकोरमायकोसिस
ICMR च्या गाईडलाइन्स पुढीलप्रमाणे -
१. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षण आहेत किंवा जे कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आले आहेत. त्यांनीच ही चाचणी करावी.
२.आवश्यकता नसल्यास उगाच टेस्ट करु नका.
३. होम टेस्ट केल्यानंतर strip चा फोटो काढून मोबाईलवर डाऊनलोड केलेल्या अॅपच्या माध्यमातून कंपनीला पाठवावा.
४. मोबाईलवरील हा डाटा ICMR च्या टेस्टिंग पोर्टलवर स्टोर करण्यात येईल.
५. या टेस्टमध्ये रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर व्यक्तीला अन्य कोणत्याही टेस्टची आवश्यकता नाही.
६. रुग्णाविषयी गुप्तता पाळावी.
७. रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर त्याला RTPCR चाचणी करावी लागेल.
८. जोपर्यंत RTPCR चाचणीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत व्यक्तीला होम आयसोलेशनमध्ये रहावं लागेल.
Web Title: Health Covid Home Test Kit Gets Approval Guidelines Out On Who Should
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..