Gardening Tips: उन्हाळ्यात फिरायला जात असाल तर झाडांसाठी करा 'हे' सोपे उपाय, राहतील हिरवेगार

Gardening Tips: उन्हाळ्यात झाडे लवकर सुकतात. जर तुम्ही बाहेरगावी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर झाडांसाठी पुढील उपाय करू शकता. ज्यामुळे झाडे हिरवीगार राहतील.
Gardening Tips:
Gardening Tips:Sakal

Gardening Tips: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांची काळजी घेणे गरजेचे असते. जर आपण बाहेर असलो तर झाडे सुकण्याची चिंता वाढतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही सुट्टीवर जात असाल तेव्हा तुमच्या झाडांची काळजी घेण्यासाठी काही खास उपाय करणे गरजेचे असते.

बाटलीचा वापर

जर तुम्ही आठवडाभर घराबाहेर जात असाल तर झाडांना पाणी देण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीचा वापर करू शकता. बाटलीच्या झाकणाला एक लहान छिद्र करा आणि कुंडीच्या वर उलटा लटकवा. त्यामुळे हळूहळू पाणी जमिनीत जाईल आणि झाडे हिरवे राहतील. माती थोडीशी सैल करा, हे अधिक पाणी शोषण्यास मदत करेल. या सोप्या पद्धतीमुळे तुमची झाडे तुम्ही येईपर्यंत हिरवीगार राहतील.

पोत्यांचा वापर

जर तुम्ही घराबाहेर जात असाल तर झाडांभोवती पोते बांधावे. त्यावर पाणी घालावे. यामुळे बराच वेळ ओलावा राहील आणि झाडे सुकणार नाही.

नारळाचा वापर

नारळाच्या वरची साल फेकून देण्याऐवजी एका भांड्यात टाकून त्यात पाणी भरावे. या सालींमुळे उन्हाळ्यात झाडांना थंडावा मिळतो आणि पाण्याविना झाडाला बरेच दिवस हिरवेगार ठेवता येईल.

Gardening Tips:
Gardening Tips : झाडांसाठी घरच्या घरी बनवा कीटकनाशक स्प्रे, स्वयंपाकघरातील 'हे' मसाले येतील कामी

पालापाचोळा वापरा

झाडांच्या मुळांभोवती पालापाचोळा किंवा पाने टाकावी. यामुळे झाडांच्या मुळांशी ओलावा टिकून राहील आणि झाड हिरवेगार राहील.

झाडे सावलीत ठेवा

बाहेर जाण्यापुर्वी झाडे सावलीत ठेवावी. ज्यामुळे कडक उन्हाच्या किरणांमुळे सुकणार नाहीत.

ग्रीन नेटचा वापर

जर तुम्ही उन्हाळ्यात काही दिवसांसाठी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर झाडांना योग्य ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही ग्रीन नेटचा वापर करू शकता. यामुळे सुर्याच्या अतिनिल किरणांमुळे झाडे सुकणार नाहीत.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com