
रश्मी विनोद सातव
महाराष्ट्रात इरकल म्हणून प्रचलित असलेली साडी मूळची कर्नाटकची असून कर्नाटकात या साडीला इलकल साडी म्हणतात. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात इलकल आणि त्याच्या आजूबाजूच्या गावात आठव्या शतकापासून देवांग, पद्मनाभ, पद्मशाली, वाल्मीकी इत्यादी जमातीचे विणकर, ही पारंपरिक इलकल साडी हातमागावर विणत असत.