esakal | आषाढी एकादशीचं महत्त्व माहितीये?; का साजरा केला जातो हा दिवस
sakal

बोलून बातमी शोधा

Vitthal-Rukmini

आषाढी एकादशीचं महत्त्व माहितीये?; का साजरा केला जातो हा दिवस

sakal_logo
By
शर्वरी जोशी

Ashadhi Ekadashi 2021 : आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी जणू पर्वणीचं. या दिवशी वारकरी मोठ्या संख्येने पंढरपुरामध्ये गर्दी करतात. हा दिवस महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या दिवसांपैकी एक मानला जातो. त्यामुळे राज्यातील अनेक कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठू नामाचा गजर करत पंढरपूरात दाखल होतात. परंतु, आषाढी एकादशी नेमकी का साजरी केली जाते, या दिवसाचं महत्त्व काय ते आज जाणून घेऊयात. (importance-of-ashadhi-ekadashi-pandharpur-wari-rituals-and-traditions-vitthal-rukmini)

एकादशीचं महत्त्व -

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे मनुष्याचं एक वर्ष म्हणजे देवांची एक अहोरात्र असते. त्यामुळे दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असं मानलं जातं. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होतं आणि दक्षिणायन सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असं म्हणतात. विशेष म्हणजे या काळात असूर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्यामुळेच या असूर शक्तींपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी अनेक जण व्रतवैकल्य करत असतात. तसंच दररोजच्या देवपूजेसोबत श्रीविष्णूची `श्रीधर’ या नावाने पूजा केली जाते. सोबत अहोरात्र तुपाचा दिवा लावला जातो. विशेष म्हणजे या काळात विठ्ठल रुक्मिणीचीही पूजा केली जाते.

हेही वाचा: फिजिक्समधून पदवी घेतलीये? 'या' क्षेत्रात आहेत करिअरच्या संधी

दरम्यान, आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरामध्ये मोठ्या संख्येने वारकऱ्यांची गर्दी होते. आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येथे येते.

loading image