Independence Day च्या द्या हटके शुभेच्छा, पहा एकापेक्षा एक भारी मेसेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Independence Day

Independence Day च्या द्या हटके शुभेच्छा, पहा एकापेक्षा एक भारी मेसेज

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. त्यात क्रांतिकारी, स्वातंत्र्यवीरांचा समावेश आहे. आपण या वर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. या खास दिनानिमित्त प्रत्येकजण आपल्या आप्तस्वकीयंना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतात.

जर तुम्हालाही सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायच्या असतील तर खालील एकापेक्षा एक भारी मेसेज जाणून घ्या. (independence day best wishes check list)

हेही वाचा: Independence Day: अंतराळवीराने अंतराळातून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या दिल्या शुभेच्छा

1. स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

2. तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा आणि
हिरवा रंगले न जाणो
किती रक्ताने तरी
फडकतो नव्या उत्साहाने

3. चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हेही वाचा: 75 Years Of Independence : ‘या’ दिग्दर्शकांनी बदलले भारतीय सिनेमाचे चित्र

4. स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे
पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे

5. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

6. वाऱ्यामुळे नाही
भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे
फडकतोय आपला तिरंगा…!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हेही वाचा: Independence Day: 'बापूंच्या चुकीने देशाचे तुकडे; RSS नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

7. “जिंकावे वा कटुन मरावं हेच आम्हाला ठावं
लढुन मरावं, मरुन जगावं हेच आम्हाला ठावं
देशापायी सारी इसरू माया-ममता-नाती !”


8.रणमर्दांनो तुमच्या पाठी
मारीत मारीत मरण्यासाठी
उभा भारतीय चाळीस कोटी
हटवा मागे पिशाच्‍च पिवळे, उडू द्या तोफा धडाधडा”

9.“गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी
ज्योतीसम समरात जळाली झाशीची राणी
त्या संतांचे, त्या वीरांचे प्रियतम तीर्थस्थान
माझा हिंदुस्थान, माझा हिंदुस्थान”

10.“वृक्षावर गंगा-यमुनांचे रुळती मौक्तिक हार
कटीस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार
महोदधीचे चरणाजवळी गर्जतसे आव्हान
माझा हिंदुस्थान, माझा हिंदुस्थान”

Web Title: Independence Day Best Wishes Check List

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Independence Daylifestyle