Luxury Brands : 'आमची भारतात शाखा आहे'; पाश्चिमात्य लग्झरी ब्रँड्ना खुणावतेय भारतीय बाजारपेठ, चीनकडे फिरवतायत पाठ!

Indian Market : भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने चांगली प्रगती करत आहे. भारतातील नागरिकांची खर्च करण्याची क्षमता वाढत आहे.
Luxury Brands in Indian Market
Luxury Brands in Indian MarketeSakal

भारतात सध्या सणासुदीला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यापासून पुढील सहा महिने आता सणांची रेलचेल असणार आहे. या दरम्यान देशातील लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. हेच लक्षात घेऊन आता कित्येक पाश्चिमात्य लग्झरी ब्रँड्स भारतात येण्याच्या तयारीत आहेत.

कित्येक ब्रँड्स हे भारतीय कंपन्यांसोबत पार्टनरशिप करून इथे येण्याच्या प्रयत्नात आहेत. आदित्य बिर्ला ग्रुप, टाटा सिल्क लग्झरी अशा भारतीय कंपन्यांसोबत स्वित्झर्लँड आणि इतर देशांमधील मोठे ब्रँड्स कोलॅब करत आहेत. इकॉनॉमिक टाईम्सने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

Luxury Brands in Indian Market
Adani Group: अदानी ग्रुपवर आणखी एक रिपोर्ट अन् कंपन्यांचे 3 तासात 35 हजार कोटी पाण्यात

भारतात येतायत मोठे ब्रँड्स

काही दिवसांपूर्वीच स्विस लग्झरी चॉकलेट कंपनी Laderach ने दिल्लीमध्ये आपलं एक बुटीक सुरू केला आहे. तर फ्रान्समधील लग्झरी रिटेलर Galeries Lafayette देखील आदित्य बिर्ला ग्रुपसोबत पार्टनरशिप करून भारतात शाखा उघडण्याच्या प्रयत्नात आहे.

स्पॅनिश लग्झरी फॅशन हाऊस Balenciga SA हे देशात येण्यासाठी रिलायन्स सोबत चर्चा करत आहे. तर, स्विस लग्झरी मल्टी-ब्रँड वॉच आणि ज्वेलरी बुटीक TimeValle; आणि डच हेअर सलून ब्रँड Keune हेदेखील भारतात शाखा उघडण्यास उत्सुक आहेत.

भारतीय बाजारपेठेवर विश्वास

चीनच्या अर्थव्यवस्थेचा बार फुसका निघाल्यामुळे कित्येक लग्झरी ब्रँड्स तिथून काढता पाय घेत आहेत. दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने चांगली प्रगती करत आहे. भारतातील नागरिकांची खर्च करण्याची क्षमता वाढत आहे. याठिकाणी मोठी शहरं उदयास येत आहेत, आणि मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग तयार होत आहे; असं मत Laderach या स्विस चॉकलेट कंपनीच्या बोर्ड मेंबर Elias Laderach यांनी व्यक्त केलं.

Luxury Brands in Indian Market
Maruti Suzuki Share: मारुती सुझुकीने शेअर बाजारात केला विक्रम, पहिल्यांदाच शेअरची किंमत भिडली गगनाला

2030 सालापर्यंत भारतीय बाजारपेठ ही सुमारे 3.5 टक्क्यांनी वाढून 200 बिलियनचा टप्पा गाठू शकते असा अंदाज वर्तवण्यात येतोय. ग्लोबल कन्सल्टिंग फर्म Bain & Co. या संस्थेने याबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. दुसऱ्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, की देशातील कोट्याधीशांची संख्या ही 2026 सालापर्यंत 1.6 मिलियन एवढी होऊ शकते. 2021 साली ही संख्या 7,96,000 एवढी होती.

लग्झरी वस्तूंना महागाईचा धोका नाही

देशातील महागाई दिवसेंदिवस वाढत चालली असली, तरी याचा महागड्या वस्तूंना किंवा त्या बाजारपेठेला आजिबात धोका नाही. या वस्तूंचा टार्गेट ऑडियन्स अगदी कमी, पण नेमका असतो. अशा वस्तू घेणाऱ्या ग्राहकांच्या बेसिक गरजा पूर्ण झालेल्या असतात; त्यामुळेच लग्झरी वस्तूंवर ते आरामात खर्च करू शकतात. असं स्तंभलेखक संतोष देसाईंनी टाईम्सशी बोलताना स्पष्ट केलं.

Luxury Brands in Indian Market
Rule changes in September: उद्यापासून देशात होणार हे 6 मोठे बदल, तुमच्या खिशावर असा होणार परिणाम

कंपन्यांच्या मोठ्या योजना

आदित्य बिर्ला ग्रुप सध्या देशामध्ये अरमानी, ख्रिस्टियन डिओर, प्राडा अशा 200 हून अधिक लग्झरी ब्रँड्सच्या वस्तू विकते. यासाठी नवीन आऊटलेट्स किंवा स्टोअर्स उघडण्याची तयारी ते करत आहेत. दुसरीकडे रिलायन्स देखील Valentino आणि Tiffany अशा ब्रँड्ससोबतच इतर मोठ्या ब्रँड्सशी कॉन्ट्रॅक्ट करत आहे. यामुळे भारतात येत्या काळात ग्लोबल ब्रँड्सची धूम पहायला मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com