

Gardening with flowering and medicinal plants offers relaxation, positivity and a sustainable way of living.
sakal
आरती धुमाळ
मला बालपणापासूनच झाडे, रोपे, वेली, पाने, फुले यांच्या सहवासात रमण्याचे वेड होते. वयोमानानुसार तो छंद अंतरात घट्ट रुजत गेला. जीवनानंद मिळवण्यासाठी हा छंद उपयोगी पडत गेला. लहानपणी आई-वडिलांच्या घरापुढे प्रशस्त अंगण असल्याने वडिलांबरोबर बागकाम करण्याची सवय लागली. प्रशस्त अंगणात आंबा, वड, उंबर, पिंपळ, लिंब अशा पारंपरिक झाडांच्या सानिध्यात राहून विविध रंग, रूपे, गंध, आकाराची फुलांची सृष्टी निर्माण करण्याची, जोपासायची सवय जडली.