सगळ्यांनाच आपली आई महत्त्वाची असते. माझी आई पंधरा-सोळा वर्षांची असतानाच तिचं लग्न झालं. ती २६ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी आत्महत्या केली. मागे आम्ही चार बहिणी आणि एक भाऊ होतो. मी सहा वर्षांची होते आणि माझा भाऊ फक्त तीन महिन्यांचा. त्यानंतर वडिलांच्या जागी आईला इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये नोकरी लागली.