

International Men's Day 2026: Theme, History & Importance
esakal
International Men's Day 2026 on November 19: दरवर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस जगभरात 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन' (International Men's Day) म्हणून साजरा केला जातो. कुटुंब, समाज आणि देशाच्या जडणघडणीत पुरुषांनी दिलेले सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदान सन्मानित करणे, तसेच त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. हा दिवस 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'च्या विरोधात किंवा स्पर्धेत नसून, पुरुषांना भेडसावणाऱ्या समस्या, ताणतणाव आणि असमानतेवर प्रकाश टाकण्यासाठी साजरा केला जातो.