International Men's Day Personality Types
sakal
Men's Day Special: प्रत्येक वर्षी १९ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. हा दिवस पुरुषांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याबद्दल, त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल आणि समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल विचार करण्यास प्रेरित करतो.
आजच्या आधुनिक युगात मानसिक आरोग्य, कुटुंबाच्या सामायिक जबाबदाऱ्या, वैयक्तिक महत्त्व या सर्व गोष्टींना समान महत्त्व दिले जात आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आपल्याला पुरुष आणि मुलांना दररोज कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याची जाणीव करून देतो.