International Sex Workers Day : या गावातली प्रत्येक मुलगी, सून ढकलली जातेय वेश्या व्यवसायात; मुघलांशी आहे संबंध?

'माझ्या वडिलांनी मला एका व्यावसायिकाकडे पाठवले तेव्हा मी १२ किंवा १३ वर्षांचा होते'
International Sex Workers Day
International Sex Workers Day esakal

International Sex Workers Day :

अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढून लोक बदल मान्य करत आहेत. सध्याच्या जगात जगायचं असेल तर रूढी, परंपरांना मागे टाकले जाते. पण, तुम्हाला माहितीय का, आपल्या भारतात असा एक समाज आहे तो महिलांना सेक्स वर्कर बनवण्यासाठी भाग पाडतोय. ते ही केवळ त्यांची परंपरा आहे म्हणून.

राजस्थानचे गुलाबी शहर म्हणून जयपूरची ओळख आहे. जयपूर हायवेवर वसलेल्या मलाहा गावात आजही प्रत्येक घरातील महिला सेक्स वर्कर बनली आहे. वयाच्या १३ व्या वर्षापासून मृत्यूपर्यंत या महिला वेश्या व्यवसाय करतात. कारण, त्यांच्या समाजाची, गावची, घराण्याची ही परंपरा आहे. आज जागतिक वेश्या व्यवसाय दिन (International Sex Workers Day )आहे. या प्रथेबद्दल आणि तिथल्या महिलांबद्दल अधिक जाणून घेऊयात.

International Sex Workers Day
ASHA Workers Strike: आशा सेविकांचं राज्यव्यापी आंदोलन, चटणी भाकरी खाऊन नोंदवला निषेध

जयपूरमधील भरतपूरपासून 2 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावाचा बोर्ड वाचला की आपसुकच गाड्या हळू धावायला लागतात. कारण, इथल्या महिल्या हायवेवर उभे राहून ग्राहकांना आकर्षिक करत असतात. आकर्षक हावभाव करून त्या ग्राहकांना बोलवतात. मग ती कोवळी मुलगी असो वा उतरते वय लागलेली वृद्ध स्त्री.

या समाजातील लोकांना आजही 300 वर्षे जुनी व्यवस्था वाहावी लागत आहे. बेड्या (बेडिया) समाजातील महिला उदरनिर्वाहासाठी वेश्या व्यवसाय करतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या समाजातील पुरुषच आपल्या बहिणी-मुलींना या दलदलीत ढकलतात. ते महिलांना आपले उत्पन्नाचे साधन मानतात.

या गावातून या व्यवसायातून बाहेर पडून संसार करून मुलाबाळात रमलेली ३५ वर्षांची फरीदा (नाव बदलले आहे) सांगते की, मला कोवळ्या वयातच व्यवसायात पडली होती. मी या बेड्या समाजातून येते त्यामुळे मला हे काम करणं भाग होतं. माझ्या घरातील इतर महिला माझ्या बहिणी, आई, वहिणी देखील हेच काम करतात.

गावातील इतर महिला दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि इतर ठिकाणी सेक्स वर्कर म्हणून काम करतात. त्यातील काही आजही गावात आहेत तर काही परराज्यात जाऊन हे काम करत आहेत.

International Sex Workers Day
Gig Workers Lok Sabha Election: कॅब चालक, स्विग्गी-झोमॅटोचे चार प्रतिनिधी लोकसभेसाठी सज्ज? 'या' मतदारसंघात देणारं झुंज

फरीदा म्हणते की, 'आम्ही पाच बहिणी आणि भाऊ आहोत. मी घरात सर्वात मोठी होते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. माझे वडील सकाळपासून दारू पिऊन पडलेले असायचे. मोठी असल्याने घर सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर होती. माझ्या वडिलांनी मला एका मध्यमवयीन व्यावसायिकाकडे पाठवले तेव्हा मी १२ किंवा १३ वर्षांचा होते.

त्या व्यावसायिकाने माझे कौमार्य भंग केले. त्या सुखाच्या बदल्यात त्याने माझ्या वडिलांना 8,000 रुपये मिळाले होते. जे 22 वर्षांपूर्वी माझ्या गावातील मुलीला मिळालेली सर्वाधिक रक्कम होती.

International Sex Workers Day
BJP Workers: निवडणुकांसाठी पैशाचा पाऊस! रेल्वे स्टेशनवर 4 कोटींची रोकड जप्त, भाजप कार्यकर्त्यासह तिघांना बेड्या

या गावात राहणारी आणि वेश्या व्यवसाय करणारी माया सांगते की, बेड्या समाजातील पुरुष महिलांना या व्यवसायात आणतात का, असे विचारल्यावर ती म्हणाली की, तेव्हा तिने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आणि म्हणाली, 'असे नाही. माझ्या कुटुंबात काका-काकूंसह पाच भाऊ आहेत. त्यांनी माझे लग्न करण्याचा खूप प्रयत्न केला. पण मी त्याला साफ नकार दिला.

भरतपूर जिल्ह्य़ात काम करणारे माजी कलेक्टर सांगतात की, बेड्या समाजातील ही जुनी परंपरा पोलिसांच्या धाकाने संपवता येणार नाही. शेकडो वर्षांपासून बेड्या समाज वेश्याव्यवसायाला उत्पन्नाचे साधन मानत आहे. मुघल काळात हा समाज नाच-गाणी करत असे, पण नंतर संस्थानांचा अंत झाल्यावर या लोकांवर उपजीविकेचे संकट आले.

त्यामुळे, समाजातील महिला वेश्या व्यवसाय करू लागल्या. 2011 च्या जनगणनेनुसार या समाजाची एकूण लोकसंख्या 80 हजार एवढी आहे. बेडिया समाजाची सर्वाधिक लोकसंख्या राजस्थान आणि मध्य प्रदेशात राहते.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com