esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

baby massage

बदामाच्या तेलाची मालिश लहान मुलांसाठी फायदेशीर आहे की नाही?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

घरामध्ये असणाऱ्या लहान बाळांना मालिश करताना आपण पाहतोच. काहीजण ती तूपाने करतात तर जण मोहरीचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईलने मालिश करतात. पण तुम्हाला माहित आहे का की, बदामाच्या तेलाची मालिशदेखील मुलांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. त्याच्या फायद्यांविषयी जाणून घेतल्यास तुम्ही देखील बदामाच्या तेलाने मुलांना मालिश करायला सुरुवात कराल.

लहान बाळांची त्वचा अतिशय नाजूक असते. बाह्य धोक्यांपासून वाचवण्यासाठी त्याच्या त्वचेला अतिरिक्त पोषण गरजेचे असते. बाळाच्या पोषणासाठी बदामाचे तेल वापरणे फायद्याचे ठरते.

चला तर मग, आज जाणून घेऊया बदाम तेलाचे फायदे-

1) स्किन हिलींग -

मोठ्यांच्या तुलनेत लहान बाळाची त्वचा लवकर बरी होते. म्हणूनच पांढऱ्या-पिवळ्या रंगाची त्वचा निघणं किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या जखमांमुळे बाळाची त्वचा कमजोर होऊ शकते. त्यामुळेच बाळाची मालिश करणे आवश्यक असते. बदामाच्या तेलात एंटी-इंफ्लामेटरी गुणधर्म असतात आणि ते त्वचेद्वारे सहज शोषले जातात. त्यामुळे कोणतीही जखम बरी होण्यास मदत होते.

2) नॅच्युरल एमोललिएंट- नैसर्गिक शोषक

शरिराच्या अंतर्गत पोषणासाठी आपण अन्न खातो. अगदी त्याचप्रमाणे त्वचा चांगली ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाची उत्पादने वापरणे आवश्यक आहे. ऑलिक अॅसिड आणि लिनोलिक अॅसिडने समृद्ध बदाम तेल एक शोषक म्हणून ओळखले जाते. जे त्वचेसाठी सुरक्षित आहे. हे त्वचेला मऊ करते आणि पोषण देते.

हेही वाचा: टेंन्शन कसलं घेताय, ही चार कामं करा नेहमी राहाल आनंदी

3) कोरडेपणा -

आईच्या गर्भात मूल सर्व प्रकारच्या वातावरणापासून दूर असते, जन्मानंतर बाळाची त्वचा कोणत्याही प्रकारचा बदल पटकन स्वीकारण्यास सक्षम नसते. अशा परिस्थितीत त्वचा कोरडी होते, म्हणून मालिश करणे आवश्यक ठरते. बदामाच्या तेलामध्ये असलेले फॅटी अॅसिड, जीवनसत्त्व अ, ई त्वचेचा कोरडेपणा दूर करतात. तसेच या तेलामुळे चिकटपणाही येत नाही.

4) स्नायू -

मालिश केल्याने बाळाचे स्नायू बळकट होतात. असे केल्याने रक्ताभिसरणही सुरळीत होते आणि स्नायूंमध्ये हालचाल देखील वाढते. मालिश केल्याने स्नायूंची ताकद वाढते, जी बाळाला रांगण्यास आणि चालण्यास मदत करते. बदामाच्या तेलामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस,कॉपर आणि एंटी इंप्लामेटरी (दाहक-विरोधी) गुणधर्म असतात, बदाम तेल मुलांची शक्ती वाढवते.

loading image
go to top