

Afternoon Nap Benefits
sakal
Cardiologist Explains Why a 20-Minute Nap Can Reset Your Brain: दुपारचं जेवण झालं की अचानक डोळे जड होऊ लागतात, कामात लक्ष लागत नाही आणि काही मिनिटे झोप घ्यावीशी वाटते. पुण्यात तर दुपारी १-४ ची वेळ आरामाचीच असते. पण ऑफिसमध्ये किंवा घरी असताना अनेकजण ही भावना दाबून ठेवतात, कारण दुपारची झोप म्हणजे आळशीपणाचं लक्षण असल्याचं त्यांना वाटतं. पण तुम्हाला माहित आहे का? तज्ज्ञांच्या मते, दुपारची केवळ 15 ते 20 मिनिटांची झोप आपल्या आरोग्यासाठी मुळात चांगली असते.