
तुमच्या तळहातावर आहे का 'Y' अक्षर? जाणून घ्या तुमच्यासाठी शुभ की अशुभ
खरं तर भविष्य पाहण्यासाठी ज्योतिष नेहमी आपला तळहात बघतात. आपल्या तळहातावर अनेक रेषा असतात. ज्योतिषशास्त्रानुसार तळहातावरची प्रत्येक रेष काही ना काही संकेत देत असते. काही रेषा व्यक्तीला फक्त संपत्तीच नाही तर त्या व्यतिरिक्त बरंच काही देते. असंच एक संकेत देणारं निशाण आपल्या तळहातावर असतं. तुम्हाला ते माहिती आहे का?
हो, इंग्रजी अक्षर Y जर आपल्या तळहातावर असेल तर ये चिन्ह तुम्ही खूप भाग्यवान असल्याचं सांगतं. या संदर्भात आपण आणखी जाणून घेणार आहोत.
असं म्हणतात, जर तुमच्या तळहातावर मणिबंध आणि जीवम रेषेच्या मध्ये Y चे चिन्ह असेल तर ते तुमच्यासाठी खूप खास आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हे चिन्ह एक चांगले आणि वाईट असे दोन्हीही मानले जाते.
Y चिन्ह शुभ केव्हा असते?
ज्योतिषशास्त्रानुसार, जीवन रेषेपासून चंद्र पर्वत वर जात थांबणारी रेषा आणि त्यापासून बनवनारी आकृती भाग्यशाली चिन्ह समजले जाते. ज्या व्यक्तीच्या हातात अशा प्रकारची Y ची आकृती बनत असेल तर असे लोक आपल्या व्यवसायात आणि जीवनात खूप नाव कमावतात. अशा लोकांचा व्यापार विदेशातही नाव कमावतो. अशा लोकांना कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता नसते.
Y चिन्ह अशुभ केव्हा असते?
जर तुमच्या हातावरील लहान रेषा जीवन रेषापासून बाहेर निघत Y चे चिन्ह बनवत असेल तर हे तुमच्यासाठी अशुभ आहे. याला विशेष म्हणजे जीवन रेषेला भेद घालणारी रेषा मानले जाते. या लोकांचे आयुष्य कमी असल्याचे संकेत ज्योतिषशास्त्रात दिले जाते. या लोकांना नेहमी आजारांचा आणि समस्यांचा सामना करावा लागतो.