Isha Ambani : लहान भावाच्या हळदीला बहिणीचा वेगळाच थाट.! ईशा अंबानीचा बंजारा लूक होतोय व्हायरल

Isha Ambani : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या हळदी सोहळ्याला ईशा अंबानीने खास बंजारा लूक केला आहे.
Isha Ambani
Isha Ambaniesakal

Isha Ambani : भारताचे प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे कपल १२ जुलैला मुंबईत लग्नबंधनात अडकणार आहे. या जोडप्याच्या लग्नापूर्वीच्य विधींना सुरूवात झाली असून बॉलिवूड, हॉलिवूडसहीत विविध क्षेत्रातील दिग्गजांची या प्रीवेडिंग सोहळ्यला उपस्थिती दिसून येत आहे.

८ जुलैला (सोमवारी) अनंत-राधिकाचा हळदी सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनंतची मोठी बहिण ईशा अंबानीने बंजारा गर्ल लूक केला होता. तिचा हा हळदीचा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हळदीचा तिचा इंडो-वेस्टर्न थीम असलेला बंजारा लूक कसा होता? चला तर मग जाणून घेऊयात.

Isha Ambani
Anant-Radhika Sangeet: संगीत सोहळ्यासाठी अंबानी कुटुंबाची थीम ठरली, बॉलिवूड सेलिब्रिटीही फॉलो करणार 'हा' स्पेशल ड्रेसकोड

ईशाचा इंडो-वेस्टर्न लूक

लहान भावाच्या हळदी समारंभाला ईशाने इंडो-वेस्टर्न थीम असलेला बंजारा लूक केला होता. तिचा हा लूक प्रसिद्ध सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनैता श्रॉफ अदाजानियाने स्टाईल केला होता. ईशाने हा कस्टम मेड मल्टिकलर लेहेंगा परिधान केला होता. जो प्रसिद्ध फॅशन डिझायनर तौरानी यांनी डिझाईन केला आहे.

ईशाच्या या लेहेंग्यावर हार्टच्या शेपमध्ये खास डिझाईन दिसून येतेय, जी तिच्या लूकला चारचाँद लावत आहे. हा मल्टिकलर लेहेंगा खास ईशासाठी डिझाईन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या मल्टिकलर लेहेंग्यात ईशा खूपच सुंदर दिसतेय.

ईशाच्या इंडो-वेस्टर्न लूकबद्दल बोलायचे झाल्यास, तिच्या या मल्टिकलर लेहेंग्यावर तिने ब्लाऊज परिधान न करता त्यावर तिने टॅसल डिटेल्स असलेला हॉल्टर नेकलाईन टॉप परिधान केला आहे. तिच्या नेकलाईन टॉपवर असलेली फ्लोरल बॉर्डर लक्ष वेधून घेत आहे.

Isha Ambani
Isha AmbaniInstagram

आता तिच्या मल्टिकलर लेहेंग्याबद्दल बोलायचे झाल्यास, तो विविध रंगांच्या पॅटर्नमध्ये डिझाईन करण्यात आला आहे. ज्यावर सुंदर भरतकाम करण्यात आले असून. फुलांची डिझाईन आकर्षक दिसत आहे. या बंजारा लूकमध्ये ईशा क्लास दिसत असून तिचे या लेहेंग्यावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ईशाचा ज्वेलरी लूक

आपला बंजारा लूक अधिक आकर्षक दिसण्यासाठी ईशाने ज्वेलरीची खास काळजी घेतली आहे. तिने या इंडो-वेस्टर्न आऊटफीटवर कुंदनचे दागिने परिधान केले असून तिने कानात हेव्ही एअरकफ्स घातले आहेत. ज्यामुळे, तिचा बंजारा लूक खुलून दिसतोय. तिने हातात आकर्षक बांगड्या घालून आणि मिनिमल मेकअप करून लूक पूर्ण केला आहे.

Isha Ambani
Nita Ambani Fitness : वयाच्या साठीतही तिशीच्या वाटतात नीता अंबानी, जाणून घ्या काय आहे त्यांचे फिटनेस रूटीन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com