

Actress on Playing Goddess Parvati
esakal
अभिनेत्री म्हणून अनेक भूमिका साकारण्याची संधी मिळते; मात्र काही भूमिका मनाच्या जवळच्या राहतात. माझ्यासाठी ‘जय देवा श्रीगणेशा’ या मालिकेतील माता पार्वतीची भूमिका अशीच अविस्मरणीय आहे. या भूमिकेने मला एक व्यक्ती म्हणूनही खूप काही शिकवले. माझा आधीपासूनच अध्यात्माकडे ओढा आहे. मी महादेवाची भक्त असल्याने माता पार्वतीची भूमिका माझ्या वाट्याला येणे, ही एक दैवी संधीच होती, असे मला वाटते.