
जन्माष्टमी 2025 साठी मयूर पिसे, बासरी आणि फुलांनी घर सजवून उत्सवाला रंगत आणा.
रांगोळी, तोरण आणि दहीहंडी थीमच्या सजावटीने श्रीकृष्णाची भक्ती आणि आनंद व्यक्त करा.
लहान मूर्ती, झुले आणि रंगीबेरंगी कपड्यांनी मंदिर सजवून उत्सव अविस्मरणीय करा.
Janmashtami 2025 Home Decoration: देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्सहाहात आणि आनंदात साजरी केली जाते. यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी 16 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. या दिवशी श्रीकृष्णाच्या बाल गोपालाची पूजा करतात आणि उपवास करतात.
श्रीकृष्णाच्या श्रृगांराचे साहित्य, कपडे, बासरी, मोरपिस यासारख्या विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. अनेक घरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीची तयारी सुरू झाली असणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरांची सुंदर आणि आकर्षक सजावट करण्यात येते.
जर तुम्हालाही तुमचे घर सजवायचे असेल तर पुढील गोष्टींचा वापर करू शकता. ज्यामुळे घऱात सुख, शांती आणि समृद्धी येते.