
जन्माष्टमीला पंचामृतासह माखन, मिश्री, खीर आणि मोदक यांसारखे गोड पदार्थ प्रसादात बनवावेत.
दहीहंडी उत्सवात दही, मध आणि फळांचा समावेश असलेले पदार्थ भक्तांना आवडतात.
प्रसादात तुळशीच्या पानांचा समावेश करून सात्विक आणि पारंपरिक पदार्थ बनवावेत.
Janmashtami Special : जन्माष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. देशभरात जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा १६ ऑगस्टला हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते. कान्हाला काही गोष्टी खूप आवडतात. जन्माष्टमीच्या दिवशी प्रसाद म्हणून या गोष्टी कृष्णाला अर्पण करणे शुभ आहे. जन्माष्टमीला कृष्णाला प्रसाद म्हणून काय अर्पण करावे ते जाणून घेऊया.